अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या नवीन प्रोजेक्टची चाहत्यांमध्ये उत्सुकता

hruta
hruta

मुंबई-  मालिका संपल्यानंतर त्यांचे लाडके कलाकार काय करत असतात? ते आता कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून भेटीला येणार याची उत्सुकता चाहत्यांना असतेच. 'दूर्वा', 'फुलपाखरु'  यांसारख्या सुपरहिट मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे मालिका संपल्यापासून गायब आहे.  हृताने 'सिंगिंग स्टार' सारखा सिंगिंग रियलिटी शो आणि 'स्ट्रॉबेर्री शेक' सारखी एका वेगळी शॉर्ट फिल्म आणि 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकातूनही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र सध्या हृता काय करतेय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.  

अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या पुण्यात असून ती शूटिंग करतेय.  हृताच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हृता लवकरंच अदिती या  एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार 'स्ट्रॉबेर्री शेक'चे दिग्दर्शक शोनिल यल्लत्तीकर यांच्या सोबत ती पुन्हा शूट करत असल्याचं कळतंय. इतकंच नाही तर 'स्ट्रॉबेर्री शेक'ची इतर टीमसुद्धा या प्रोजेक्ट मध्ये सहभागी आहे. हृताची ही टीम नवीन भन्नाट काहीतरी घेऊन येणार अशी चर्चा आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta (@hruta12)

अदितीची भूमिका देण्याबद्दल तिने तिचे दिग्दर्शक शोनील यल्लत्तीकर यांचे सोशल मीडियावर आभार मानले आहेत. यानिमित्ताने 'स्ट्रॉबेर्री शेक'च्या टीमचं रियुनियनच झालंय असं म्हणायला हरकत नाही. मात्र अदितीच्या या भूमिकेविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता हृताचा हा प्रोजेक्ट सिनेमाच्या स्वरुपात आहे, शॉर्ट फिल्म आहे की एखाद्या मोठ्या OTT प्लेटफार्मसाठी आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. 

hruta durgule upcoming project with strawberry shake team 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com