हुमाची तारेवरची कसरत 

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

गुरिंदर चढ्ढा यांच्या "वॉईसरॉयज हाऊस' या चित्रपटातून हुमा कुरेशी आपल्या हॉलीवूडमधील करिअरची सुरुवात करतेय. हा चित्रपट बर्निनेल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात येणार आहे; पण या चित्रपटाचे डबिंग अजूनही पूर्ण झालेले नाहीय. त्यामुळे हुमा सध्या त्या चित्रपटाचे डबिंग करण्यातही बिझी आहे आणि दुसरीकडे बॉलीवूडमध्ये तिचा "जॉली एलएलबी-2' हा चित्रपटही येतोय. त्याच्या प्रमोशनचे कामही जोरदार सुरू आहे. त्यामुळे सध्या तिची बॉलीवूड आणि हॉलीवूड अशी तारेवरची कसरत चाललेली आहे. दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडणे तसे कठीणच; पण ती ही कसरतही एन्जॉय करतेय. अगदी सहजपणे ती दोन्हीकडे आपली भूमिका नीट निभावतेय.

गुरिंदर चढ्ढा यांच्या "वॉईसरॉयज हाऊस' या चित्रपटातून हुमा कुरेशी आपल्या हॉलीवूडमधील करिअरची सुरुवात करतेय. हा चित्रपट बर्निनेल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात येणार आहे; पण या चित्रपटाचे डबिंग अजूनही पूर्ण झालेले नाहीय. त्यामुळे हुमा सध्या त्या चित्रपटाचे डबिंग करण्यातही बिझी आहे आणि दुसरीकडे बॉलीवूडमध्ये तिचा "जॉली एलएलबी-2' हा चित्रपटही येतोय. त्याच्या प्रमोशनचे कामही जोरदार सुरू आहे. त्यामुळे सध्या तिची बॉलीवूड आणि हॉलीवूड अशी तारेवरची कसरत चाललेली आहे. दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडणे तसे कठीणच; पण ती ही कसरतही एन्जॉय करतेय. अगदी सहजपणे ती दोन्हीकडे आपली भूमिका नीट निभावतेय. "जॉली एलएलबी-2' रिलीज झाल्यावर ती बर्निलला या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी जाणार आहे.  
 

Web Title: huma qureshi