हुमाचं तमीळ सिनेसृष्टीत पदार्पण 

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जून 2017

"गॅंग्स ऑफ वासेपूर', "लव शव ते चिकन खुराना', "एक थी डायन', "बदलापूर', "जॉली एलएलबी 2' चित्रपटातील अभिनयकौशल्यानं सर्वांना आपलंसं करणारी अभिनेत्री हुमा कुरेशी आता तमीळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झालीय.

"गॅंग्स ऑफ वासेपूर', "लव शव ते चिकन खुराना', "एक थी डायन', "बदलापूर', "जॉली एलएलबी 2' चित्रपटातील अभिनयकौशल्यानं सर्वांना आपलंसं करणारी अभिनेत्री हुमा कुरेशी आता तमीळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झालीय. साऊथचा सुपरस्टार रजनीकांतच्या "काला' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हुमा पहिल्यांदाच रजनीकांतसोबत काम करणारेय. यात ती मुस्लिम मुलगी जरीनाची भूमिका साकारणार आहे. हुमाने नुकतीच याबाबतची माहिती ट्विटरवर दिली. तिने लिहिलं की, मी "काला' चित्रपटाची तयारी करीत आहे. हळूहळू जरीना बनते आहे. त्यासाठी कठोर मेहनत घेते आहे. चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलचं चित्रीकरण चाळीस दिवसात होणार आहे. निर्मात्यांनी चेन्नईत मुंबईतील धारावी येथील झुग्गी बस्ती बनवली आहे आणि तिथे चित्रीकरण होणार आहे. 
 

Web Title: Huma Qureshi in work mode for upcoming Rajnikanth starrer ‘Kaala’