आदराने बोलावले तरच भारतात जाईन : नदीम

टीम इ सकाळ
गुरुवार, 29 जून 2017

मी निस्सीम भारतीय आहे. भारताबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. त्यामुळे भारतात मला परतायचे आहे. पण आदराने मला बोलावले तरच मी जाईन, अशी स्पष्ट भूमिका संगीतकार नदीम यांनी घेतली आहे. गेल्या 20 वर्षांपासून नदीम इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहेत.

लंडन: मी निस्सीम भारतीय आहे. भारताबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. त्यामुळे भारतात मला परतायचे आहे. पण आदराने मला बोलावले तरच मी जाईन, अशी स्पष्ट भूमिका संगीतकार नदीम यांनी घेतली आहे. गुलशन कुमार हत्येप्रकरणात अटक वाॅरंट निघाल्यापासून नदीम इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहेत.

1997 मध्ये निर्माते गुलशन कुमार यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा अत्यंत जलदगतीने तपास सुरू झाला. त्यावेळी संशयाची सुई त्यावेळची लोकप्रिय संगीतकार जोडी नदीम श्रवण यांपैकी नदीम यांच्यावर आली. त्यांच्याविरोधात अटक वाॅरंटही निघाले होते. त्याचवेळी नदीम यांनी परदेशात पळ काढला व ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. आता इतक्या वर्षांनी भारतात परतणार का असे एका मुलाखती दरम्यान विचारल्यावर ते म्हणाले, मी मनाने भारतीयच आहे. मला माझ्या देशात परतायला आवडेल. परंतु मला बोलावणे यायला हवे.'

नदीम यांनी भारत सोडल्यावर श्रवण यांनी आपले सांगितिक काम जवळपास थांबवले. 

Web Title: i am indian nadeem esakal news