मी आहे "स्ट्रिक्‍ट' आई : काजोल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

अभिनेत्री काजोल सांगत आहे तिच्या आईपणाबद्दल!

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

कम बॅक मॉम

दोन विभिन्न टोकाच्या स्वभावाचे मी आणि अजय दोघे बोहल्यावर चढलो. आमच्या दोघांच्या लग्नाला घरातून आणि चित्रपट क्षेत्रातूनही कडाडून विरोध झाला. या क्षेत्रातील काही दिग्गज आणि खुद्द माझे डॅड शोमू मुखर्जी यांनी मी इतक्‍या लहान वयात लग्न करू नये, असा मला सल्ला दिला. कारण अर्थातच मी अभिनयात पुढे जावं, शिखर गाठावं, असं त्यांना वाटत होतं. मात्र, मी निग्रही होते. मी अजयशी मराठी आणि पंजाबी पद्धतीने लग्न केलं. आणि हो, तेव्हा मी अजयला अट घातली, की आपला हनिमून म्हणजे जगाची भ्रमंती असेल!

त्याप्रमाणे अजयने "कस्टमाइज्ड' टूर ठरवली आणि आम्ही दोघं वर्ल्ड टूर कम हनिमूनला निघालो. एक महिन्याची टूर होती. पण, सात ते आठ देश झाल्यावरच अजय "होमसिक' झाला आणि आजारी पडला. डोकं दुखतंय, अशी कारणं देत त्यानं माझ्यासह मुंबई गाठली. आमचे वैवाहिक जीवन छान पद्धतीने सुरू झाले. मला आणि अजयला चित्रपटाच्या ऑफर्स यायला लागल्या आणि आम्ही त्या विचारपूर्वक स्वीकारत होतो. दरम्यान, मला मातृत्वाची चाहूल लागली त्या वेळी मी स्वतः विचारपूर्वक निर्णय घेतला, की यापुढे मी मोजकेच चित्रपट करेन. आजही मी त्या निर्णयावर ठाम आहे.

Kajol Ajay

माझा पूर्ण वेळ मी मातृत्वासाठी द्यावा, याच विचारांची मी पूर्वीही होते, आजही आहे आणि उद्यादेखील असेन. मुलांचे घडण्याचं, विकासाचं वय सोळापर्यंत असतं. त्यांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या पालकांचा, विशेषतः आईचा सहवास त्यांना लाभला की संस्कारापासून ते त्यांच्या आहारापर्यंत मुलांची पाळंमुळं उत्तम घडतात, असा माझा ठाम विश्‍वास आहे. मी आणि माझी धाकटी बहीण तनिषा शाळेत होतो, तेव्हा आमची आई, तनुजा आघाडीची अभिनेत्री होती. त्यामुळे तिचा वेळ आम्हाला फारसा मिळाला नाही. आमचं आईच्या अनुपस्थित काही अडलंही नाही. आम्ही आमच्या आजीच्या प्रेमळ-उबदार सहवासात होतो. त्यामुळे मॉम नसल्याचं आम्हा दोघींना प्रकर्षाने जाणवलं नाही. नोकरचाकर, अधूनमधून भेटणारे डॅड, असा सगळा आलबेल मामला होता तेव्हा...

सकाळ प्रकाशनाच्या "सुपर मॉम' या सेलिब्रिटी कर्तृत्वशालिनीचा मातृत्वप्रवास दर्शविणाऱ्या आगामी पुस्तकातून. या प्रेरणादायी पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू. मूळ किंमत - रु. 200. प्रकाशनपूर्व नोंदणी - रु. 140. अधिक माहितीसाठी - सकाळ प्रकाशन, 595, बुधवार पेठ, पुणे-2.
संपर्क - 8888849050.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am a Strict Mother says Actress Kajol in Maitrin Supplement of Sakal Pune Today