मी डायलॉग्ज विसरते!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

सलमान खानबरोबर ‘रेस ३’ मध्ये जॅकलिन, डेझी शाह आणि बॉबी देओल आहेतच. पण साकीब सलीम आणि फ्रेडी दारूवाला हे कलाकारही काम करत आहेत; ते नवीन आहेत आणि सलमानबरोबर पहिल्यांदाच काम करीत आहेत. हे सगळेच कलाकार सलमान खानची नेहमीच स्तुती करत असतात.

पण जॅकलिन तिचा अनुभव सांगताना म्हणते, ‘जेव्हा मी सलमान खानबरोबर सेटवर काम करत असते, तेव्हा मला नेहमीच टेन्शन असतं. मी बेचैनदेखील होते. सलमानला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटता तेव्हा तुम्हाला त्याची भीती वाटू शकते. अर्थात तशी त्यांची इच्छा नसते; पण त्यांची एनर्जीच तशी आहे. मी आजही त्यांच्याबरोबर काम करताना डायलॉग्ज विसरते. पण जेव्हा आम्ही इतर वेळी भेटतो तेव्हा त्यांच्याबद्दल मी निश्‍चिंत असते. पहिल्यांदा भेटले होते तेव्हाही बेचैन असायचे. पण हळू हळू मला ते कसे आहेत, हे कळायला लागले तेव्हा त्यांच्याबद्दलची ही भीती मनातून निघून गेली.’ जॅकलिनने सलमानबरोबर ‘किक’मध्ये काम केले होते. ‘रेस ३’नंतर सलमान-जॅकलिनचा ‘डान्सिंग डॅडी’ हा चित्रपटही येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: i forget my dialogues said jacqueline fernandez

टॅग्स