Javed Akhtar on Kangana Ranaut: माझा इतका अपमान आजवर.. कंगना विरुद्ध जावेद अख्तर झाले व्यथित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 kangana ranaut, javed akhtar, kangana ranaut news, javed akhtar news, Javed Akhtar on Kangana Ranaut News

Javed Akhtar on Kangana Ranaut: माझा इतका अपमान आजवर.. कंगना विरुद्ध जावेद अख्तर झाले व्यथित

Javed Akhtar on Kangana Ranaut News: जावेद अख्तर आणि कंगना रनौत यांच्यात मोठी खडाजंगी झाली. 2020 मध्ये कंगना रणौतने एका मुलाखतीदरम्यान जावेद अख्तरवर आरोप केला होता की गीतकार जावेद अख्तर यांनी तिला धमकी दिली होती.

पण, जावेदने या प्रकरणाला फारसे महत्त्व न देता प्रकरणाकडे दुर्लक्ष केला. पण, कोरोनाच्या काळात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीने पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला.

यावेळी जावेद अख्तर यांनीही कंगनाच्या आरोपांकडे लक्ष वेधले आणि अभिनेत्रीविरोधात थेट कोर्टाची पायरी चढली.

कंगनाच्या विरोधात ठोस पावले उचलत जावेदने अभिनेत्रीविरोधात कोर्टात मानहानीचा अर्ज दाखल केला. ज्यावर ३ मे रोजी सुनावणी झाली.

( I have been insulted so much.. Javed Akhtar is distressed against Kangana Ranaut )

मानहानीच्या खटल्यात जावेद अख्तर यांनी कोर्टासमोर आपली बाजू मांडली आणि सांगितले की, "मी अशा ठिकाणाहून आलो आहे जिथे कोणी 'तू' म्हणत नाही.

मी लखनऊचा आहे आणि तिथे कोणीही 'तू' म्हणत नाही, उलट 'अहो जाहो' म्हणायला शिकवले जाते. कोणी माझ्यापेक्षा 30-40 वर्षांनी लहान असले तरी मी त्याला तुम्ही म्हणून संबोधतो. मी माझ्या वकिलाशी सुद्धा कधी अरे तुरे करून बोललो नाही.

माझ्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांमुळे मला धक्का बसला आहे. खूप धक्का बसला आहे." अशी बाजू जावेद अख्तर यांनी व्यक्त केली.

जावेदने त्यांचे वकील जय भारद्वाज यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. जावेद म्हणाला की,

“कंगना रणौतने २०२० साली एका मुलाखतीदरम्यान माझ्यावर अनेक आरोप केले होते. पण, जेव्हा सुशांतचे निधन झाले तेव्हा सर्वत्र कंगनाची चर्चा रंगली.

मात्र, त्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, या प्रकरणावरून गदारोळ सुरू असताना मीच त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचेही तिने सांगितले. हे माझ्यासाठी खूप अपमानास्पद होते.

जावेद अख्तर पुढे म्हणतात.. "सुशांतच्या मृत्यूनंतर आत्महत्या हा शब्द चर्चेत आला. कंगना हे अनेक मुलाखतींमध्ये बोलली आहे की मी एका सुसाइड ग्रुपचा सदस्य आहे आणि त्याच प्रकारे मी लोकांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करत आहे. पण हे अजिबात खरे नाही."

जावेद अख्तर यांनी बाजू मांडल्यानंतर पुढील सुनावणीसाठी कंगना रणौतच्या वकिलाने जावेद अख्तर यांना उलटतपासणीसाठी १२ जूनची तारीख निश्चित केली आहे.