Salman Khan: लग्न न करता मी मुलांचं प्लॅनिंग केलेलं पण... सलमान खानचं वक्तव्य चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan, Salman Khan news, Salman Khan movies, Salman Khan wedding, Salman Khan affair, Salman Khan girlfriend

Salman Khan: लग्न न करता मी मुलांचं प्लॅनिंग केलेलं पण... सलमान खानचं वक्तव्य चर्चेत

Salman Khan News: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान प्रचंड चर्चेत असलेला अभिनेता. किसी का भाई किसी कि जान असलेला हा बॉलिवूड अभिनेता त्याच्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. सलमान खानचे सिनेमे म्हणजे त्याच्या फॅन्ससाठी विशेष पर्वणी असतात.

सलमान खान नुकतंच रजत शर्मांच्या लोकप्रिय शो आप की अदालत मध्ये सहभागी झालेला. त्यावेळी सलमानने विविध विषयांवर त्याचं मनमोकळं केलं. याच शो मध्ये सलमानने लग्न आणि मुलं या विषयावर त्याचं मत व्यक्त केलं.

(I planned children without marriage but... Salman Khan's statement in aap ki adalat)

सलमान खानला लहान मुलं किती आवडतात हे जगजाहीर आहे. सलमान अनेकदा त्याच्या बहिणीच्या मुलांसोबत आणि छोट्या भाच्यांसोबत धम्माल करताना दिसतो.

दबंग स्टार असलेल्या सलमानने स्वतः सुद्धा त्याच्या मुलांचा गांभीर्याने विचार करत होता.

इंडिया टीव्ही शो 'आप की अदालत'मध्ये भाईजानला त्याच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'लग्नाची योजना होती.

पण ते बायकोसाठी नव्हते तर मुलासाठी होते. पण भारतीय कायद्यानुसार हे शक्य नाही. आता आपण पुढे काय करावे, कसे करावे ते बघूच.."

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने लग्न न करताही आज तो दोन मुलांचा बाप आहे.

तेव्हा सलमानने उत्तर दिले, 'मी तेच करण्याचा प्रयत्न करत होतो. पण कायदा बदलला आहे, आता काय होते ते पाहू. मला मुलांची खूप आवड आहे.

पण माझ्या मुलाची आई फक्त माझी बायको असेल." अशा भावना सलमानने व्यक्त केल्या.

दरम्यान, सलमाच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झालं तर.. सलमान अॅक्शन एंटरटेनर किसी का भाई किसी की जानमध्ये काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला.

या सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून नकारात्मक टीका सहन करावी लागली. तरीही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.

सलमान खान आता आगामी टायगर ३ या बिग बजेट सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहे.