ठसा उमटवणे कठीण... 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

स्वरा भास्कर हे नाव सध्या "अनारकली ऑफ आराह' या चित्रपटामुळे सगळीकडे गाजतंय. पण जसं कतरिना, कंगना किंवा अगदी अमृता राव पण घ्या... या नायिकांची नावं सगळ्या भारताला माहीत आहेत. पण अजूनही स्वरा भास्कर म्हटलं की कोण स्वरा भास्कर? हे कोणीतरी विचारतच. स्वराचं पण तेच म्हणणं आहे. ती म्हणते की, मी आजही स्वतःला बॉलीवूडमधलं समजत नाही. कारण तिने हवा तसा आपला ठसा बॉलीवूडमध्ये अजून उमटवलेला नाहीये.

तिने "प्रेम रतन धन पायो', "तनू वेड्‌स मनू रिटर्नस्‌', "निल बट्टे सन्नाटा' अशा काही ठराविक चित्रपटातून काम केलं आहे. पण या चित्रपटांनी फारशी कामगिरी केली नाही आणि ज्या चित्रपटांनी केली त्यात स्वराच्या मुख्य भूमिका नव्हत्याच मुळी. त्यामुळे ट्विटरवरील केआरके बरोबरची काही बाचाबाची सोडल्यास ती अजूनही भारतात तशी प्रसिद्ध अभिनेत्री बनलेली नाही. ती म्हणते, "या इंडस्ट्रीत खूप स्ट्रगल आहे. आपला ठसा इथे उमटवणं फार कठीण आहे. मी इथे माझ्या कामासाठी रोज स्ट्रगल करतेय.' स्ट्रगल कोणाला चुकलाय म्हणा. पण स्वराला आपण तिच्या पुढच्या कारकिर्दीसाठी ऑल द बेस्ट देऊ...  
 
Web Title: I still look at myself as an outsider, says Swara Bhaskar