'खाणं-पिणं सोडलं, पुरेसे पैसैही नव्हते' नैराश्याबाबत परिणीतीचा धक्कादायक खुलासा

parineeti talks about her depression
parineeti talks about her depression

मुंबई : 'लेडिज व्हर्सेस रिकी बहेल' या चित्रटातून परिणीतीने बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं. प्रियांका चोप्राची बहिण असूनही आज तिने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. परिणीतीचा आज 31 वा वाढदिवस आहे. आज ती बी- टाउनमध्ये वेगळं स्थान निर्माण करुन असली तरी कधीकाळी तिला नैराश्याचा सामना करावा लागला होता. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी 'डिप्रेशन' म्हणजे  नैराश्याचा सामना केला आहे. वेगाने धावणाऱ्या जीवनाच्या आणि करीअरच्या शर्यतीत आपण कुठे मागे पडता कामा नये असाच सर्वांचा प्रयत्न असतो. अपयशामुळे कलाकारांना नैराश्याला सामोरं जावं लागलं आहे. दीपिका पदूकोन, करण जोहर, इलियाना डिक्रुज आणि अशा अनेकांनी त्याचा खुलासा करुन डिप्रेशनवर मातही केली. परिणीतीने नुकताच एका मुलाखतीमध्ये तिच्या डिप्रेशनविषयीचा धक्कादायक खुलासा केला आहे.

कधीकाळी डिप्रेशनमध्ये गेलेल्या परिणीतीकडे नवा सिनेमा नव्हता, पैसे नव्हते या सर्वावर मात करत तिने करीअरला सावरलं आणि पुन्हा एकदा स्वत: ला सिद्ध केलं. डिप्रेशनविषयी बोलताना परिणीती म्हणाली,' 2014 ते 2015 या एका वर्षाचा काळ माझ्यासाठी वाईट होता. जवळपास दिड वर्ष परिस्थिती बिकट होती. 'दावत-ए-इश्क' आणि  'किल दिल' हे दोन्ही माझे चित्रपट अपयशी ठरले. मला आयुष्यात पहिल्यांदाच पराभवाला सामोरं जावं लागलं. हातात नवा प्रोजेक्ट नव्हता आणि माझ्याकडे पैसेही उरले नव्हते. काही पैसे होते त्यातून मी घर घेतलं होतं आणि गुंतवणूक केली होती. याचकाळात माझं ब्रेकअपही झालं होतं. सगळ्याच गोष्टी चुकीच्या घडत होत्या.' 

पुढे ती म्हणाली,' असं वाटत होतं आयुष्यातले सर्व रस्ते बंद झाले आहेत आणि पुढे काही चांगलं घडेल याची आशाही वाटत नव्हती. याचा परिणाम असा झाला की, मी खाणं- पिणं, झोपणं कमी केलं. त्यावेळी माझा जवळचं असं कोणीचं मित्र किंवा मैत्रीण नव्हती. मी लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं सोडून दिलं होतं. एवढचं काय मी कुटुंबियांशी संपर्क तोडला होता. फक्त दोन आठवड्यातून एकदा बोलायचे. त्यावेळी मी फ्क्त माझ्या रुममध्ये बसून दिवसभर टिव्ही बघायचे आणि  झोपून असायचे. चित्रपटात नैराश्यात गेलेल्या मुलीला ज्याप्रमाणे दाखवितात त्याचप्रमाणे मी झाले होते. दिवसातून जवळपास दहा वेळा मी रडत बसायचे आणि त्यामुळे माझ्या छातीत दुखू लागलं होतं.' 

पण या कठीण काळात माझा भाऊ सहेज चोप्रा आणि मैत्रिण संजना यांनी साथ दिली. या वाईट काळातून बाहेर येण्यासाठी मला त्यांनी खूप मदत केली. सहेज आणि संजनामुळेच मी नैराश्यातून बाहेर येऊ शकले असंही परिणीतीने सांगितलं. 

त्या कठीण काळातून मी हळू हळू बाहेर पडले, नवे सिनेमे केले आणि आयुष्य पुन्हा एकदा आत्मविश्वासाने जगण्यास सुरुवात केली. 2016 मध्ये नैराश्यामधून बाहेर आल्यावर तिने 'गोलमाल अगेन' आणि 'मेरी प्यारी बिंदू' हे चित्रपट केले. परिणाती खरंतर परदेशी 'इनव्हेस्टमेंट मॅनेजर' म्हणून जॉब करत होती मात्र आर्थिक मंदीमुळे ती भारतात परतली आणि चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com