शाहरुखच्या घरात एक रात्र राहण्याची जबरदस्त संधी, इथे करा अर्ज आणि...

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 19 November 2020

शाहरुख खानच्या दिल्लीतील घरात एक रात्र राहण्यासाठी दोन सामान्य माणसांची निवड एका सिलेक्शन कमिटीद्वारे केली जाईल.

मुंबई- बॉलीवूड बादशाह शाहरुख खानच्या घरी जर तुम्हाला एका रात्रीासाठी पाहुणे म्हणुन जायची संधी मिळाली तर कसं वाटेल? अर्थातच तुमच्यासाठी ती आनंदाची पर्वणी असेल. मात्र हे शक्य होऊ शकतं केवळ जर तुम्ही भाग्यवान असाल तरंच. शाहरुख खानच्या दिल्लीतील घरात एक रात्र राहण्यासाठी दोन सामान्य माणसांची निवड एका सिलेक्शन कमिटीद्वारे केली जाईल. ज्यामध्ये शाहरुख खानची पत्नी गौरी खानचा देखील समावेश असेल.  

हे ही वाचा: राजामौली दिग्दर्शित 'RRR' सिनेमामधील आलियाच्या शूटिंगला होतोय उशीर, दिग्दर्शक भन्साळी कारणीभूत  

अमेरिकी वॅकेशनल रेंटल ऑनलाईन कंपनी Airbnb ही संधी सामान्य माणसांना देत आहे. यासाठी तुम्हाला वेबसाईट http:// www. airbnb.com/d/homewithopenarms वर जाऊन अर्ज करावा लागेल. हा अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२० आहे. तसंच १५ डिसेंबर रोजी दोनजणांच्या नावाची घोषणा केली जाईल.

 अमेरिकी वैकेशन रेंटल ऑनलाइन कंपनी Airbnb यह मौका आम लोगों को दे रही है. इसके लिए आपको वेबसाइट http://www.airbnb.com/d/homewithopenarms पर जाकर आवेदन करना होगा. इस आवदेन की आखिरी तारीख 30 नवंबर 2020 रखी गई है और 15 दिसंबर को दो चयनित लोगों के नाम की घोषणा कर दी जाएगी. (फोटो साभारः Instagram @iamsrk)

नावाची घोषणा झाल्यानंतर शाहरुखच्या दिल्लीमधील पंचशील पार्क येथील त्याच्या घरात निवड झालेल्या २ जणांना १३ फेब्रुवारी २०२१ ची रात्र राहण्याची जबरदस्त संधी मिळणार आहे. याबाबतची माहिती स्वतः शाहरुख खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

मिडिया रिपोर्ट्सनुसार, या दरम्यान २ भाग्यवान लोकांना शाहरुखच्या घरात रात्री डिनर करण्याची संधी देखील मिळणार आहे शिवायते शाहरुखसोबत सिनेमा देखील पाहु शकतात. असं पहिल्यांदाच घडेल जेव्हा कोण्या सामान्य माणसाला बॉलीवूड सुपरस्टारच्या घरात एक रात्र राहण्याची संधी दिली जाईल. 

शाहरुखच्या या दिल्लीतील घराला शाहरुखची पत्नी गौरी खानने डिझाईन केलं आहे. शाहरुख भलेही त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत मुंबईतील घरी राहत असेल तरी देखील दिल्लीतील घरात त्याच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. शाहरुख जेव्हा केव्हा दिल्लीला येतो तेव्हा तो त्याच्या या घरात राहतो.   

if you are lucky you can stay in shah rukh khans delhi house one night  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if you are lucky you can stay in shah rukh khans delhi house one night