Pathaan: ७०० कोटी कमावलेस थोडे पैसे देतोस का? फॅनच्या प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shah rukh khan, pathaan, pathaan box office report

Pathaan: ७०० कोटी कमावलेस थोडे पैसे देतोस का? फॅनच्या प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

Shah Rukh Khan Pathaan: पठाण सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झालाय. हा सिनेमा लवकरच १००० कोटींच्या घरात दाखल होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पठाणने आजवर जगभरात ७०० कोटींची कमाई केली आहे. पठाण निमित्ताने शाहरुख त्याच्या फॅन्स सोबत #AskSRK च्या अंतर्गत प्रश्न उत्तरांचं एक सेशन करत असतो. शाहरुखचे फॅन्स त्याला बिनधास्त प्रश्न विचारत आहेत. शाहरुख सुद्धा फॅन्सच्या सर्व प्रश्नांना भन्नाट उत्तर देत आहे.

(Shahrukh's amazing answer to a fan's question about pathaan)

अशाच एका फॅनने शाहरुखला एक वेगळाच प्रश्न ट्विटर वर विचारला. "शाहरुख भाई मी आजवर ५ वेळा पठाण पाहिलाय.. आणखी ५ वेळा पठाण बघण्याची इच्छा आहे.. तर ७०० कोटीतले थोडे पैसे देतोस का?" प्रश्न भलताच होता.

आता यावर शाहरुख काय उत्तर देतो याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. शाहरुखने सुद्धा त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं कि.."नाही माझ्याकडुन तुला फक्त एंटरटेनमेंट.. एंटरटेनमेंट.. एंटरटेनमेंट मिळेल. पैसे हवी असतील तर काहीतरी काम कर" असं गमतीशीर शैलीत म्हणाला. शाहरुखने दिलेलं हे उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय

शाहरुख खानचा पठाण रिलीज होऊन आता आठवडा झाला. गेल्या आठवड्याभरात शाहरुखच्या पठाणने जगभरात ५०० कोटींच्या वर कमाई केली. जगभरातले फॅन्स पठाणचं कौतुक करत आहेत. शाहरुख खानचा पठाण रिलीज होऊन आता आठवडा झाला. गेल्या आठवड्याभरात शाहरुखच्या पठाणने जगभरात ५०० कोटींच्या वर कमाई केली.

जगभरातले फॅन्स पठाणचं कौतुक करत आहेत. शाहरुखचा पठाण आता ७०० कोटींच्या घरात गेलाय. इतक्या लवकर इतकी भरघोस कमाई करणारा पठाण हा पहिलाच सिनेमा असेल. पठाण मुळे बॉलिवूडला एक चांगला बूस्टर मिळालाय

भारतभरातील संपूर्ण थेटरमधलं वातावरण पठाणमय झालं आहे. पठाण निमित्ताने शाहरुख खानने 4 वर्षांनंतर हिंदी इंडस्ट्रीत कमबॅक केलंय. शाहरुखच्या पठाण सिनेमाचं अनेक कलाकार तोंड भरून कौतुक करत आहेत. २५ जानेवारीला रीलीज झालेला पठाण शाहरुख खानच्या करीयरमधला अत्यंत महत्वाचा सिनेमा आहे.