Boney Kapoor: काका, ती तुमच्या मुलीच्या वयाची!अभिनेत्रीसोबतचा फोटो वादात| IIFA 2022 Boney Kapoor Trolled Actress Host Aarti Khetrpal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IIFA 2022 Boney Kapoor Trolled

काका, ती तुमच्या मुलीच्या वयाची!अभिनेत्रीसोबतचा फोटो वादात

Boney Kapoor Trolled - प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक बोनी कपूर हे सध्या ट्रोल होताना दिसत आहे. त्याचे कारण त्यांचा एका अभिनेत्रीसोबतचा फोटो सोशल (Bollywood News) मीडियावर व्हाय़रल झाला आहे. त्या फोटोमुळे त्यांच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. यापूर्वी देखील बोनी कपूर यांचे अभिनेत्रींसोबतचे (IIFA 2022) फोटो व्हायरल झाले आहे. मात्र सध्याच्या फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयफा पुरस्कार सोहळ्यातील हा फोटो असून त्या फोटोमुळे (Bollywood Celebrities) बोनी कपूर यांच्यावर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे. तुम्ही ज्या अभिनेत्री सोबत फोटो घेतला आहे ती तुमच्या मुलीच्या वयाची आहे अशा पद्धतीनं त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. आयफा 2022 पुरस्कार सोहळा (Entertainment news) सध्या अबुधाबीतील यश आयलंडमध्ये सुरु आहे. त्याठिकाणी बॉलीवूडमधले वेगवेगळे सेलिब्रेटी सहभागी झाले आहेत.

बोनी कपूर अभिनेत्री आरती खेत्रपालसोबत फोटो काढला आहे. त्यात त्यांनी तिच्या कमरेभोवती हात टाकून फोटोसाठी पोज दिली आहे. तो फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी बोनी कपूर यांचा क्लासच घेतला आहे. त्यांना जे नाही त्या प्रतिक्रिया देण्यात धन्यता मानली आहे. व्हाईट कलरचा कुर्ता बोनी कपूर यांनी परिधान केला आहे. तर आरती थाई हाय वन पीस ड्रेसमध्ये आहे. यावेळी त्यांच्यासोबत बॉलीवूडमधील वेगवेगळे कलाकार देखील उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. ओटीटी अॅक्ट्रेस आणि होस्ट म्हणून ओळख असलेली आरती ही आयफामध्ये पहिल्यांदाच सहभागी झाली आहे. विरल भयानीनं इंस्टावरुन या इव्हेंटचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहे.

आरतीनं अनेक सेलिब्रेटींसोबतचे फोटो शेयर केले असून तिचा बोनी कपूर यांच्यासोबतच्या फोटोला नेटकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. एकानं त्यावर कमेंट केली आहे की, आरतीनं जी वेशभुषा केली आहे ती काही समजत नाही. बॉलीवूडचे सेलिब्रेटी कशाप्रकारे ड्रेसिंग करतात हे काही कळायला मार्ग नाही. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, काका ज्या अभिनेत्रीसोबत आपण फोटो शेयर केला आहे ती तुमच्या मुलीच्या वयाची आहे.

हेही वाचा: IIFA 2022: 'सलमान तुला एवढा कसला रे गर्व!' नेटकऱ्यांची सडकून टीका, कारण...

हेही वाचा: IIFA Awards | सई ताम्हणकर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, दुबईत मराठी पताका

बोनी कपूर हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक आहे. ते प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर, खुशी कपूरचे वडिल आहेत. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे ते पती आहेत. बोनी कपूर हे यापूर्वी देखील बऱ्याचवेळा ट्रोल झाले आहेत. मात्र या गोष्टींची ते फारशी दखल घेत नाही. ते आता लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Web Title: Iifa 2022 Boney Kapoor Trolled Actress Host Aarti Khetrpal Photo Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top