IIFA 2023: रितेश-जेनीलियाच्या 'वेड'नं बॉलीवुडचा आयफा गाजवला.. 'या' पुरस्काराने केलं सन्मानित..

आयफा पुरस्कार सोहळ्यात झाला मराठी चित्रपटाचा गौरव..
IIFA Awards 2023 Riteish and genelia Deshmukh wins special award for Marathi Movie Ved
IIFA Awards 2023 Riteish and genelia Deshmukh wins special award for Marathi Movie Ved sakal

Ritesh Deshmukh and Genelia D'souza:  रितेश देशमुख - जिनिलिया देशमुख यांच्या वेड सिनेमाची जादू अजूनही कमी झालेली आहे. वेड प्रदर्शित होऊन तब्बल पाच महिन्यांचा कालावधी लोटला तरीही हा चित्रपट अजून प्रेक्षक विसरलेले नाहीत.

या चित्रपटाने सलग दोन महीने बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवत 75 कोटींची कमाई केली. या चित्रपटात रिटेश आणि जिनिलीयानं प्रमुख भूमिका साकारल्यानं चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. आता या चित्रपटाबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

नुकतीच रितेश - जिनिलियानं एक फोटो शेयर करत 'वेड' मोठी आनंदाची बातमी दिली आली आहे. ज्यामुळे मराठी प्रेक्षकांना नक्कीच आनंद होईल.

(IIFA Awards 2023 Ritesh and genelia Deshmukh wins special award for Marathi Movie Ved)

IIFA Awards 2023 Riteish and genelia Deshmukh wins special award for Marathi Movie Ved
Kiran Mane: माझ्या डोळ्यादेखत त्यांनी 'विलास पाटील'चा खून केला.. किरण मानेंच्या पोस्टनं खळबळ..

बॉलीवूडमध्ये प्रचंड मानाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे 'आयफा' हा. या पुरस्काराची सर्वचजन आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी हा सोहळा मोठ्या दिमाखदारपणे पार पडतो. यंदाचा ‘आयफा - २०२३’ हा पुरस्कार सोहळा दुबईतील आबूदाबी मध्ये रंगला.

या पुरस्कार सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती. पण यंदाचा सोहळा मराठी माणसासाठी विशेष ठरला. कारण या पुरस्कार सोहळ्यात यावेळी रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटाला विशेष पुरस्कार येऊन सन्मानित करण्यात आलं. त्यामुळे मराठमोळ्या 'वेड'चा बॉलीवुडमध्येही डंका वाजला.

IIFA Awards 2023 Riteish and genelia Deshmukh wins special award for Marathi Movie Ved
Karisma Kapoor: ज्याची निंदा केली त्याच पहिल्या नवऱ्या सोबत फिरतेय करिश्मा कपूर, नेकऱ्यांनी दाखवली जागा..

'वेड' या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती कारण या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशनं दिग्दर्शनात पाऊल टाकलं, तर त्याची पत्नी जिनिलीयानं मराठी सिनेसृष्टीत प्रथमच अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं.

त्यामुळे लोकांनी हा चित्रपट पाहण्यानंसाठी तुंबळ गर्दी केली. हा चित्रपट केवळ हीट झाला नाही तर अनेक पुरस्कार पटकावले. आता तर या चित्रपटाने 'आयफा' पुरस्कारावर आपली मोहोर उमटवून मराठी सिनेमाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याचे रितेशनं चाहत्यांना फोटो पोस्ट करून सांगितले आहे. तर जिनीलियानं देखील पोस्ट करून या पुरस्कारासाठी सर्वांचे आभार मानले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com