IIFW तर्फे 'द इंटीमेट फॅशन टूर' राष्ट्रीय दौऱ्याची घोषणा

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

या कार्यक्रमामुळे उदयोन्मुख फॅशन डीझायनर्स, मॉडेल्स, कलाकार आणि उद्योजकांना स्वतःचे कौशल्य दाखविण्यासाठी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि समविचारी जाणकारांकडून शिकण्यासाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

पुणे : इंडिया इंटीमेट फॅशन विक (आयआयएफडब्ल्यु) या अंतर्वस्त्रामधील डिझाईनला वाहिलेल्या भारतातील एकमेव फॅशन सप्ताहातर्फे अलिकडेच आयआयएफडब्ल्यु नेक्स्ट-द इंटीमेट फॅशन टूर या दौऱ्याची घोषणा करण्यात आली. आयआयएफडब्ल्यु सिझन 3 ची सुरुवात पुण्यातील सर्वोत्तम लक्झरी नाईटक्लबपैकी एक असलेल्या ‘कल्ट हाऊस’ पासून होत आहे.

या कार्यक्रमामुळे उदयोन्मुख फॅशन डीझायनर्स, मॉडेल्स, कलाकार आणि उद्योजकांना स्वतःचे कौशल्य दाखविण्यासाठी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि समविचारी जाणकारांकडून शिकण्यासाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. दोन यशस्वी सत्रानंतर ब्रँडची आपल्या तिसऱ्या पर्वातून भारतातील टायर1 आणि टायर2 शहरातील कौशल्य शोधण्याची योजना आहे.

Image may contain: 1 person, standing

आयआयएफडब्ल्युची सुरुवात झाल्यापासूनच शरीरातल्या अंतर्भागांचे आरोग्य जपण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि याविषयीची जागरूकता याबद्दल आयआयएफडब्ल्यु काम करत आहे. चुकीच्या अंतर्वस्त्रामुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न (पुनरुत्पादन, त्वचा रोग इत्यादी.) याबद्दल लोकांचे प्रबोधन करण्याचे काम ते करतात. चांगल्या अंतर्वस्त्रांच्या वापरातून अंतर्भागांचे आरोग्य जपणे ही चैनीपेक्षाही सवय बनली पाहिजे याकडे या ब्रँडचा ओढा आहे.

ब्रँडतर्फे प्लस साईझ आकारातील फॅशनवरही भर देण्यात येत असून अगदी प्लस साईझ आकारातील लोकांनाही अंतर्वस्त्रांच्या फॅशनचा अधिकार आहे यावर ब्रँडचा ठाम विश्वास आहे. त्याचबरोबर क्वीर फॅशन वीक सारख्या कार्यक्रमातून एलजीबीटीक्यू समाजातील कौशल्य शोधण्याचाही ब्रँडचा प्रयत्न आहे.

इंडियन फॅशन वीक मध्ये ‘बू द टॅब्यू’ या टॅगलाईनसह असलेल्या प्रवाहाची चलती असताना खुलेपणाने अंतर्वस्त्रांबद्दल बोलण्याविषयीचे अवघडलेपण काढून टाकण्याची ब्रँडची इच्छा आहे.

Image may contain: 2 people, people standing and text

इंडिया इंटीमेट फॅशन विकचे संस्थापक नीरज जवंजाळ म्हणाले, “अंतर्वस्त्रे, वैयक्तिक आरोग्य आणि त्यासंदर्भातले प्रश्न याविषयी असलेले अवघडलेपण दूर लोटणे यासाठी आमचे सगळे प्रयत्न आहेत. अंतर्वस्त्रांची फॅशन आणि यासंदर्भातील प्रबोधन यावर आम्ही खूप लक्ष केंद्रित करत आहोत. यासंदर्भात आम्ही काही उपक्रमही हाती घेत असून लवकरच ते जाहीर करण्यात येतील. आयआयएफडब्ल्यु आयआयएफडब्ल्यु नेक्स्टच्या माध्यमातून भारतातील 8 शहरांमध्ये दौरे काढणार असून त्याची सुरुवात पुण्यापासून होत आहे. पुण्यातून सुरुवात होऊन नंतर हा दौरा गोवा, बंगळूरू, दिल्ली आणि पुढे आणखी काही शहरात होणार आहे. अवघडलेपण दूर करण्यासाठी आणि वेगळ्या विभागात सुरुवातीची पाऊले उचलण्यासाठी आम्ही ओळखले जातो. त्यामुळे नेहमीचा अधिकृत शो प्रकार मोडून काहीतरी अधिक प्रभावशाली, अधिक पोहोचणारे आणि डीझायनर्स, मॉडेल्स, कलाकार या सगळ्यांनाच आपले कौशल्य दाखविता येण्यासाठी आम्ही आयआयएफडब्ल्यु नेक्स्ट सुरु केले. यामुळे इंटीमेट टूर प्रकार या शहरांमध्येही आम्हांला रुजविता येईल,”

इंडिया इंटीमेट फॅशन विकच्या कायदा विभाग प्रमुख विजेता सिंग म्हणाल्या, “इंडिया इंटीमेट फॅशन विकची तयारी करत असताना आम्ही जे संशोधन करत होतो तेव्हा आम्ही असंख्य मुली आणि स्त्रियांची मनोभूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्या मुलाखती घेतल्या. अनेक चकित करणाऱ्या गोष्टी पुढे आल्या. योग्य प्रकारच्या अंतर्वस्त्रांमुळे काम करणाऱ्या स्त्रीचा काम करत असणाऱ्या ठिकाणी आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर योग्य प्रकारच्या अंतर्वस्त्रांमुळे विविध प्रकारच्या आरोग्य विषयक समस्यांच्या विरोधात स्त्रीचे पोषण होते. मूल जन्माला घातल्यानंतर स्त्रीच्या शरीरात असंख्य प्रकारचे बदल होत असतात. अशावेळी ‘योग्य कप’ ची निवड करणं हे निरोगी आणि आरामदायी राहण्यासाठी खूप महत्वाचे असते. असं असलं तरी, भारतात अनेक माता या बदलांकडे आणि योग्य आकारातील अंतर्वस्त्राबाबत दुर्लक्ष करतात. अजूनही भारतीय समाजात अंतर्वस्त्रांबाबत खुलेपणानं चर्चा होत नाही. यात असलेल्या अवघडलेपणामुळेही याकडे दुर्लक्ष होतं.”

आयआयएफडब्ल्यु नेक्स्टबद्दल अधिक स्पष्ट करून सांगताना आयआयएफडब्ल्युचे मध्यम प्रमुख अमित पांड्ये म्हणाले, “मुली आणि स्त्रियांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबद्दल प्रबोधन करण्यासाठी ‘बू द टॅब्यू’ याबद्दल सामाजिक जाणीव जागृती निर्माण करण्याचे काम आयआयएफडब्ल्यु करत आहे. यामुळे भारतीय ब्रँड आणि डीझायनर्स यांनाही या विभागात काम करण्यासाठी आणि जागतिक व्यासपीठावर चमकण्यासाठी पाठबळ मिळत आहे. याजोडीला, आयआयएफडब्ल्यु डिझाईन शिक्षणातही काम करण्याचा विचार करत आहे. हे डिझाईन स्कूल अद्ययावत, जागतिक दर्जाचे आणि डिझाईनचे कौशल्य अंगी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल. हे डिझाईन स्कूल नक्कीच जगातील सर्वोत्तम संस्थांपैकी एक म्हणून नावारूपाला येईल.”

ते पुढे म्हणाले, “भारतीय फॅशन उद्योगाला नवीन आयाम देऊन विविध कारागिरांना रोजगार निर्माण करून देणे हेही या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. आमच्या राष्ट्रीय दौऱ्यातून भारताच्या दूरवरच्या अंतर्गत भागातील कौशल्य शोधणे आणि त्यांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणे हेही शक्य होईल.”   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IIFW plans international intimate fashion tour