
Ileana Dcruz: टॉलीवूडचा इलियानाला दणका.. तामिळ इंडस्ट्रीनं थेट केलं बॅन..कारण ऐकाल तर व्हाल हैराण
Ileana Dcruz: बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुज आपल्या प्रोफेशनल लाइफपेक्षा अधिक आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेली पहायला मिळते. कधी तिचं नाव कतरिना कैफच्या भावासोबत जोडलं जातं तर कधी तिचे बोल्ड बिकिनी फोटो व्हायरल होताना दिसतात.
इलियानानं हिंदीसोबतच साऊथच्या सिनेमातूनही काम केलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का की तामिळ फिल्म इंडस्ट्रीनं इलियानाला बॅन केलेलं. (ileana dcruz has reportedly been banned from tamil film industry..here the big reason behind that..)

Ileana Dcruz
इलियानाला तामिळ फिल्म इंडस्ट्रीनं बॅन केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,इलियानानं काही निर्मात्यांकडून सिनेमाचं अॅडव्हान्स पेमेंट घेतलं आणि नंतर शूटसाठी नकार दिला..ज्याचा फटका निर्मात्यांना बसला.
त्यानंतर तामिळ इंडस्ट्रीत तिला बॅन करण्याचा सिलसिला सुरु झाला. मात्र यासंदर्भात अद्याप इलियाना किंवा तामिळ इंडस्ट्रीतील कोणाचेही अधिकृत स्टेटमेंट समोर आलेले नाही. त्यामुळे या माहितीत किती सत्यता आहे हे सांगणं थोडं कठीण आहे.
बोललं जात आहे की इलियाना कतरिनाचा भाऊ सेबेस्टियनसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. गेल्या ८ ते १० महिन्यापासून ते रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात आहे.
ई टाईम्सच्या रिपोर्टनुसार सेबेस्टियन आणि इलियाना केवळ एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाहीत तर गेल्या काही काळापासून कतरिनाच्या बान्द्रा येथील जुन्या घरात ते एकत्र वेळही घालवताना दिसतात.
माहितीसाठी थोडं सांगतो की,कतरिनाच्या वाढदिवसाच्या पार्टीतील फोटोत इलियाना डिक्रुज देखील दिसली होती. असं असलं तरी अद्याप इलियानाच्या या रिलेशनशीप बद्दलही ठाम काही सांगता येत नाही. कतरिनाचा भाऊ सेबेस्टियन लॉरेंट मिशेल हा यूके चा मॉडेल आहे.
हेही वाचा: नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
इलियान डिक्रुज सोशल मीडियावर नेहमी सक्रिय पहायला मिळते. तिचे खूप सुंदर बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बऱ्याचदा तर तिचे बिकिनीतील बोल्ड फोटो व्हायरल होताना दिसतात. त्यातनं ती आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसते.
सध्या बॉलीवूडमध्ये इलियाना न दिसल्यासारखीच आहे तरी सोशल मीडियावर मात्र तिचे जवळपास १६ मिलियन फॉलोअर्स आहेत. आणि ती फक्त ८९ लोकांना फॉलो करते. आता लवकरच ती बादशाह सोबत 'सब गजब' मध्ये दिसणार आहे.