इलियानाने केले अचंबित 

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

बऱ्याच वेळेला कलाकारांना चित्रपटातील भूमिकेसाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. कधी वजन वाढवावे लागते किंवा घटवावे लागते; तर कधी वेगवेगळ्या भाषेचेही प्रशिक्षण घ्यावे लागते.

अभिनेत्री इलियाना डिक्रुझला आगामी चित्रपट "मुबारकां'साठी पंजाबी भाषेवर मेहनत घ्यावी लागली. तिने आपल्या पंजाबी भाषेने "मुबारकां' चित्रपटाच्या निर्मात्यांना अचंबित केले. इतकेच नाही, तर इलियानाने चित्रपटाचे डबिंग एका आठवड्यात पूर्ण करून सर्वांची प्रशंसाही मिळवली.

खरे तर इतक्‍या कमी वेळात डबिंग करणे तिच्यासाठी सोपे नव्हते. कारण इलियानाला पंजाबी नीट बोलता येत नव्हते, पण तिने डबिंगसाठी दिवसातील 10 ते 11 तास खर्च केले. याबाबत ती सांगते, की "सुरुवातीला पंजाबीत बोलणे खूप अवघड गेले. अनिल कपूर यांच्यासोबत डबिंग करताना मी खूप घाबरले होते. पंजाबी कुडीसारखे बोलता यावे यासाठी मी लेखकांसोबत बसून त्यांच्यासोबत पंजाबी भाषेचे धडे गिरवले व उच्चारांवर काम केले. आता मला खूप आनंद होतो आहे, की मी पंजाबी भाषा स्पष्ट बोलण्यामध्ये यशस्वी झाले.' 

Web Title: Ileana d'cruz made astonished