सेक्सलाईफवर काय म्हणाली इलियाना?

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

शिबानी दांडेकरच्या एका चॅट शोमध्ये तिने सेक्ससंबंधी मत मांडलं. यावरून ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अभिनेत्री इलियाना डिक्रूझचं नुकतंच ब्रेकअप झालंय. पण तिने केलेल्या एक वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिबानी दांडेकरच्या एका चॅट शोमध्ये तिने सेक्ससंबंधी मत मांडलं. यावरून ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अभिनेत्रीला चाहत्याने विचारला 'नको तो' प्रश्न!

Image result for ileana d'cruz

तिने काही दिवसांपूर्वी 'सेक्स आणि प्रेमाचा काहीही संबंध नाही' असं वक्तव्य केलं होते. या वक्तव्यामुळे ती खूप ट्रोलही झाली होती. याचाच धागा पकडत शिबानी दांडेकरने तिला याबाबत प्रश्न विचारला असला, तिने त्याचे थेट उत्तर दिले. यावेळी इलियाना म्हणली की, माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. सेक्सचा आनंद लुटता यायला हवा, पण त्यात प्रेमही असायला हवे. भावना असतील तरच तुम्हाला सेक्सचा विलक्षण आनंद मिळतो. असे तिने यावर स्पष्टीकरण दिले. 

काही दिवसांपूर्वीच इलियानाचे अँण्ड्र्यू निबॉनशी ब्रेकअप झाले आहे. तेव्हाही ती बरीच चर्चेत आली होती. 

Image result for ileana d'cruz boyfriend name


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ileana dcruz talks on sex life in Shibani Dadndekar chat show