जेएनयुमध्ये गेल्याने दीपिकाला कोट्यवधींचा फटका, कसा काय?

वृत्तसंस्था
Monday, 13 January 2020

आज ट्विटरवरही #दीपिकाहटाओ_LUXबचाओ हा हॅशटॅग ट्रेंडिंग होता. यावर दीपिकाला ब्रँण्ड अॅम्बेसिडर पदावरून काढून टाका व लक्सचे उत्पादन वाचवा अशा आशयाचे ट्विट्स करण्यात आले आहेत.

जेव्हापासून 'छपाक' गर्ल दीपिका पदुकोन जेएनयुमध्ये भेट देऊन आली, तेव्हापासून तिच्याबाबतीत काही ना काही घडतच आहे. ती जेएनयुमधील हिंसाचारानंतर तिथे गेली म्हणून देशभरातून तिच्यावर टीका केली. तिच्या छपाक चित्रपटावर बहिष्कार घाला असे सांगण्यात आले. तर काही जण तिच्या पाठिशी उभे राहिले. पण आज असा काही निर्णय झाला, ज्याचा दीपिकाला चांगलाच फटका बसणार आहे. काय आहे तो निर्णय?

JNU Attack:जेएनयूच्या आंदोलनात उतरली दपिका; जयभीमच्या घोषणा सुरू असतानाच आगमन

'नवभारत टाइम्स';च्या वृत्तानुसार, दीपिका या कॉन्ट्रॉव्हर्सीमध्ये अडकल्यापासून ती ज्या ब्रण्डच्या जाहिरातीत काम करते अशा जाहिराती सर्व जाहिरात कंपनीने कमी प्रमाणात दाखविण्याचा निर्णय घेतला. तर काहींनी हे प्रकरण निवळेपर्यंत दीपिकाच्या जाहिरातीच दाखवायच्या नाहीत, असा चंगच बांधला आहे. तसेच या प्रकरणावरून जाहिरात कंपन्यांनी अभिनेते/ अभिनेत्रींसोबत करार करताना नवा क्लॉज तयार केला आहे. 'कोणतीही कंपनी त्यांच्या ब्रॅण्डची गुणवत्ता स्थिर राहावी याचा विचार करते. त्यामुळे कोणत्याही वादाचा आपल्या कंपनीला फटका बसू नये यासाठी कंपनी सतत प्रयत्न करत असते,' असे कोका-कोला आणि अॅमेझॉनसारख्या कंपन्यांना रिप्रेझेंट करणाऱ्या आयपीजी मीडिया ब्रॅण्डसचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी सिन्हा यांनी सांगितले.

Image result for deepika padukone jnu

दहा मिनिटांचं मौन आंदोलन आणि दीपिकाचा मास्टरस्ट्रोक...

आज ट्विटरवरही #दीपिकाहटाओ_LUXबचाओ हा हॅशटॅग ट्रेंडिंग होता. यावर दीपिकाला ब्रँण्ड अॅम्बेसिडर पदावरून काढून टाका व लक्सचे उत्पादन वाचवा अशा आशयाचे ट्विट्स करण्यात आले आहेत. तर एका जाहिरात कंपनीने दीपिकाचा हा वाद संपत नाही, तोपर्यंत दाखवू नये, जेव्हा हा वाद निवळेल त्यानंतर ही जाहिरात दाखवा असे सांगितल्याचे 'मीडिया बाइंग एजन्सी'ने सांगितले.

#boycottchhapaak 'टुकडे-टुकडे गँगसोबत गेलेल्या दीपिकाला ब्लॉक करा'; नेटकरी भडकले

दीपिका सर्वाधिक मानधन घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या ती ब्रिटानिया गुड्डे, लॉरियल, तनिष्क, विस्तारा एअरलाइन्स,अॅक्सिस बॅकसह अन्य 23 ब्रॅण्डसाठी दीपिका जाहिरात करते. त्यामुळे दीपिकाची कमाई 103 कोटी रुपयांच्या घरात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिका चित्रपटासाठी 10 कोटी आणि जाहिरातींसाठी 8 कोटी रुपये मानधन आकारते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Impact on advertise profession of Deepika Padukone after JNU visit