मामापेक्षा 'भाचा' वरचढ, मित्राच्या बायकोसोबत इम्रानच्या अफेयरची चर्चा...

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाचा इम्रान खान भलेही त्याच्या भूमिकेमुळे ओळखला गेला नसला तरी, तो त्याच्या (Aamir Khan) वेगवेगळ्या चर्चांमधून कायमच चर्चेत राहिला आहे.
Imran khan affair Lekha Washington
Imran khan affair Lekha Washington esakal

Bollywood News: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाचा इम्रान खान भलेही त्याच्या भूमिकेमुळे ओळखला गेला नसला तरी, तो त्याच्या (Aamir Khan) वेगवेगळ्या चर्चांमधून कायमच चर्चेत राहिला आहे. सोशल मीडियावर त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याला फॉ़लो करणाऱ्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. (Imran Khan) जाने तू या जाने ना या चित्रपटातून त्यानं बॉलीवूडमध्ये पदार्पण (Bollywood Movies) केलं होतं. त्यानंतर बोटावर मोजता येतील असे चित्रपट केले. मात्र त्याला काही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे इम्रान खाननं निर्मिती क्षेत्रात आपलं नशीब आजमवण्यास सुरुवात केली. यासगळ्यात क्षेत्रात व्यस्त असताना त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही वादळं आली. त्यापैकी एक म्हणजे त्याचं वैवाहिक आयुष्य हे सध्या चर्चेत आलं आहे. तो त्याची पत्नी अवंतिकापासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. हे असं होणार याची सुरुवात 2021 मध्येच झाली होती की काय अशा इम्रानबद्दलच्या काही बातम्यांवरुन दिसुन आले आहे.

जानेवारी 2011 मध्ये अवंतिका आणि इम्रान खानचं लग्न झालं. सुरुवातीच काही वर्षे आनंदात संसार केल्यानंतर त्या संसाराला तडे गेले आहेत. आणि अवंतिका - इम्रान एकमेकांपासून वेगळं होण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक चाहत्यांना मोठा धक्काही बसला आहे. डीएनएनं दिलेल्या एका वृत्तानुसार, इम्रानच्या वैयक्तिक आयुष्यात जे वादळ आले आहे, त्याचे कारण आणखी एक अभिनेत्री असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून इम्रान हा त्याच्या मित्राची पत्नी लेखा वॉशिंग्टनला डेट करतो आहे अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. तसेच बॉलीवूडच्या पार्टीजमध्ये देखील याप्रकारची चर्चा रंगु लागली आहे. अद्याप अवंतिका आणि इम्रान यांच्यातील घटस्फोट नेमक्या कोणत्या कारणास्तव होतोय याची काही ठोस माहिती समोर आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अवंतिका आणि इम्रान यांच्यात वाद सुरु होते. ते एकत्रही राहत नव्हते. आता त्यांनी आपण एकमेकांपासून वेगळे राहत असून घटस्फोट घेत असल्याचे सांगितलं आहे. इम्राननं देखील अवंतिकासोबतचे आपले संबंध संपल्याचे जाहिर केल्याची सुत्रांची माहिती आहे.

Imran khan affair Lekha Washington
आमिर खाननंतर भाचा इमरानही पत्नीपासून होणार विभक्त;लवकरच निर्णय जाहिर करणार

लेखा वॉशिंग्टनच्या बाबत सांगायचे झाल्यास ती एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिचं आणि इम्रान खानचं अफेयर आहे अशा अफवाही आता समोर येऊ लागल्या आहेत. बॉलीवूड हंगामानं दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खानचे लेखासोबत प्रेमसंबंध असून त्याचा परिणाम त्याच्या वैवाहिक आयुष्यावर झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच वर्षांपासून इम्रान आणि लेखा हे एकमेकांच्या संपर्कात आहे. त्याची माहिती अवंतिकाला नव्हती. लेखाविषयीची माहिती समोर येण्यामागे तिचा पती पाब्लो चॅटर्जी हा आहे. अवंतिका घरातून निघुन जाण्यामागे लेखा हे एक कारण होतं.

असंही सांगितलं जात आहे की, इम्राननं मुंबईतील पाली हिलमध्ये काही प्रॉपर्टीही खरेदी केली आहे. त्यानं खरेदी केलेली प्रॉपर्टी ही त्याची मैत्रीण लेखाच्या घरापासून जवळ असल्याची चर्चाही आहे. अजुनतरी लेखा ही कुणाच्या नजरेत आली नसली तरी तिचे आणि इम्रानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लेखाही अनेकदा इम्रानच्या घरीही जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com