Riteish Deshmukh - Genelia Deshmukh: २१ वर्षांपासून तुझ्या... रागात जिनिलियाने रितेशच्या तोंडावर पाणी फेकलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

riteish deshmukh, genelia deshmukh, ved movie

Riteish Deshmukh - Genelia Deshmukh: २१ वर्षांपासून तुझ्या... रागात जिनिलियाने रितेशच्या तोंडावर पाणी फेकलं

'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबरला रिलीज झाला. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख या दोघांची वेड सिनेमात महत्वाची भूमिका. रितेशचा दिग्दर्शक म्हणून तर जिनिलियाचा अभिनेत्री म्हणून मराठीतला हा पहिलाच सिनेमा आहे. रितेश आणि जीनिलिया या सिनेमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांच्या मनामनात बसले. एकमेकांवर आकंठ प्रेम करणारे रितेश - जिनिलिया यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय.

जीनिलियाने रागाच्या भरात रितेशच्या चेहऱ्यावर पाणी फेकलंय. असं काय झालंय दोघांमध्ये? बघूया.. रितेश तू झूठी मैं मक्कार सिनेमाचं गाणं गात होता. तेव्हा गाण्याच्या ओळीप्रमाणे जिनिलियाने रागाच्या भरात रितेशच्या चेहऱ्यावर पाणी फेकलं. या दोघांचे रील व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. रितेश आणि जीनिलियाचा हा नवीन व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबरला रिलीज झाला. रितेश व जिनिलीयाच्या 'वेड' बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. वेडने रेकॉर्डतोड कमाई करत सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

वेडने आजवर ७० कोटींची कमाई केली आहे. वेड आता थेट ८० कोटींच्या घरात जाण्यासाठी घोडदौड करतोय. वेडने जगभरातून ७० कोटींची विक्रमी कमाई केली आहे. त्यामुळे रितेशचा वेड सिनेमा मालामाल झाला असून तो लवकरच १०० कोटींच्या क्लब मध्ये जाईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. वेड ची आता सहाव्या आठवड्यात दमदार एंट्री झाली आहे.

'वेड' हा सिनेमा नागा चैतन्य आणि समंथा यांच्या 'मजिली' या तेलुगू सिनेमावर आधारित आहे. वेड जरी या सिनेमावर आधारित असला तरीही रितेश आणि जिनिलियाचा जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे‌. अगदी वेड मूळ मजीली सिनेमापेक्षा चांगला आहे अशा प्रतिक्रिया आल्यात.

या सिनेमात रितेश - जिनिलिया सोबत वेड मध्ये जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुपरस्टार सलमान खान सुद्धा सिनेमात छोट्याश्या गाण्यातून लोकप्रिय झालाय.