'त्या' दुर्घटनेनंतर बदललं प्रिती झिंटाचं आयुष्य

The incident changed life of preity zinta
The incident changed life of preity zinta

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री येतात. पण, अशा मोजक्याच काही अभिनेत्रींनी वर्षानोवर्षे प्रेक्षकांच्या मनावर घर केले आहे. अशीच एक अभिनेत्री आहे जिने प्रेक्षकांच्या मनावर घर केले आहे ती म्हणजे प्रिती झिंटा. दिसायला अतीशय सुंदर असणाऱ्या या प्रिटी वुमनचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या सकाळ टीमकडून प्रितीला अनेक शुभेच्छा. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्याविषयी काही माहित नसलेल्या गोष्टी !

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sunshine after the rain is pure happiness  #weekendvibes #sunshine #ting  @ashguptaslife

A post shared by Preity G Zinta (@realpz) on

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रितीने सर्वांनाच भूरळ घातली. 31 जानेवारी 1975 ला हिमाचल प्रदेशात प्रितीचा जन्म झाला. नीलप्रभा तिची आई आणि दुर्गानंद झिंटा तिच्या वडिलांचं नाव. वयाच्या 13 व्या वर्षी तिच्या वडिलांचे निधन झाले. एवढ्या लहान वयातच प्रितीच्या डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरवले. याच घटनेने प्रिती आणि तिच्या परिवाराला मोठा धक्का बसला. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक बदल झाले.या घटनेनंतर प्रितीच्या आईची तब्येत बिघडली आणि जवळपास दोन वर्षे ती बेडवरच होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कभी कभी ... #weekendvibes  #ting

A post shared by Preity G Zinta (@realpz) on

हिमाचल प्रदेशच्या कॉन्वेंट ऑफ जीजस एंड मेरी बोर्डिग स्कूलमध्ये तिनं शिक्षण घेतलं. शाळेमध्ये असताना अनेकदा तिला एकटेपणा वाटत असे पण, तिला चांगले मित्र-मैत्रीणी मिळाले. हुशार विद्याथ्यांपैकी एक प्रिती होती. तिला बास्केटवॉल खेळायलाही आवडायचे. पुढील शिक्षण तिनं 'सेंट बेडेज कॉलेज' मधून पूर्ण केले. सायकोलॉजीमधून एम.ए.चं शिक्षण घेतलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mood kiya toh मुड़ liya  #Diwali #ting

A post shared by Preity G Zinta (@realpz) on

असा मिळाला पहिला ब्रेक 
शेखर कपूरच्या 'तारा रमपम' मध्ये प्रिती हृतिक रोशनसोबत दिसणार होती. पण, काही कारणाने हा चित्रपट तेव्हा बनू शकला नाही. शेखर कपूरने दिग्दर्शक मणीरत्नम यांना शाहरुख आणि मनीषा कोइराला यांच्या 'दिल से' या चित्रपटामध्ये प्रितीला कास्ट करण्याची विनंती केली. या सिनेमामध्ये ती सपोर्टींग रोलमध्ये दिसली. 20 मिनिटांच्या त्या सपोर्टींग रोलमध्येही प्रितीने उत्तम अभिनयासह प्रेक्षकांचं मन वेधून घेतलं. त्यानंतर 'सोल्जर' मध्ये प्रिती मुख्य भूमिकेत दिसली. 

त्यानंतर प्रितीने मागे वळून पहिले नाही. एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट तिने केले. मिशन कश्मिर, अरमान, रास्ते प्यार के, दिल चाहता है, सलाम नमस्ते, कभी अलविदा ना कहना असे सुपरहिट सिनेमे तिने केले. प्रितीने 2016 मध्ये बॉयफ्रेंड जेन गुडइनफसोबत लग्न केलं. काही दिवसांपूर्वी ती 'भैयाजी सुपरहिट' या चित्रपटातून दिसली पण, हा सिनेमा बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Finally when it’s time to leave the sun comes out  #morningrun #patiparmeshwar #winter #workout #ting

A post shared by Preity G Zinta (@realpz) on

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com