
महाभारत मालिकेत भीमाची भूमिका करणा-या अभिनेता प्रवीण कुमार यांनी आपल्या महाभारत मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मुंबई - दूरदर्शनवर महाभारत, रामायण या मालिकांनी त्यावेळी एक वेगळ्या प्रकारचे वातावरण तयार केले होते. दर रविवारी या मालिकेचे प्रसारण व्हायचे. लहानांपासून थोरामोठ्यांनाही महाभारत आणि रामायण मालिकेनं भुरळ घातली होती. अप्रतिम सादरीकरण, योग्य मांडणी, कलाकारांचा सुंदर अभिनय आणि अचूक दिग्दर्शन यामुळे या दोन्ही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले ते कायमचे.
महाभारत मालिकेत भीमाची भूमिका करणा-या अभिनेता प्रवीण कुमार यांनी आपल्या महाभारत मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रामानंद सागर यांची रामायण तर बीआर चोपडा य़ांच्या महाभारत मालिकेनं प्रेक्षकांना आपलेसे केले होते. या मालिकांमध्ये ज्या कलाकारांनी काम केले त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. ते त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यापर्यत त्या मालिकेमुळे प्रसिध्द राहिले. प्रवीण कुमार हे त्यापैकी एक अभिनेते. महाभारतात कृष्णाची भूमिका करणा-या नीतिश भारव्दाज यांना ज्याप्रमाणे अमाप लोकप्रियता मिळाली तशीच भीमाची भूमिका साकारणा-या प्रवीण कुमार यांनाही चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले.
6 डिसेंबर 1947 रोजी जन्म झालेल्या प्रवीण कुमार यांची उंची साडेसहा फुट एवढी होती. त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी देशासाठी अनेक मेडल्स मिळवली. तुम्हाला खरे वाटणार नाही पण महाभारत मालिकेत येण्यापूर्वी ते बीएसएफ मध्ये डेप्युटी कमांडंट होते. मात्र त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. 1986 मध्ये एका त्यांच्या एका पंजाबी मित्रानं त्यांना सांगितले की, बीआर चोपडा हे महाभारत मालिका बनवत आहेत त्यांना भीमाच्या भूमिकेसाठी एका कलाकाराची गरज आहे. त्यासाठी ते एका कलाकाराच्या शोधात आहेत. अशाप्रकारे त्यांनी भीमाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली आणि त्यांना त्या मालिकेत काम मिळाले.
Republic Day Special ;'कोई देश परफेक्ट नहीं होता, उसे बेहतर बनाना पड़ता है'
1988 पर्यत प्रवीण कुमार यांनी 30 चित्रपटांमध्ये काम केले होते. 1981 मध्ये आलेल्या रक्षा चित्रपटात ते सर्वप्रथम दिसले. 1974 मध्ये तेहरान मध्ये झालेल्या एशियन गेम्स मध्येही त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी रौप्य पदक जिंकले होते. इतकेच नव्हे तर 1968 आणि 1972 मध्ये झालेल्या ऑलम्पिकमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. त्याच्या आधारावर त्यांना बीएसएफमध्ये नोकरी मिळाली होती. 1998 मध्ये प्रवीण कुमार यांनी अभिनय क्षेत्र सोडले होते. त्यानंतर त्यांनी 14 वर्षानंतर 2012 मध्ये भीमाची भूमिका साकारली होती.