esakal | 'शेरनी'चा गौरव, विद्याच्या नावानं फायरिंग रेंज
sakal

बोलून बातमी शोधा

actress vidya balan

'शेरनी'चा गौरव, विद्याच्या नावानं फायरिंग रेंज

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणून विद्या बालनचे (vidya balan) नाव घ्यावे लागेल. बॉलीवूडची (bollywood) आघाडीची अभिनेत्री म्हणून विद्याची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा शेरनी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. समीक्षकांनी देखील त्याचे कौतूक केले. विषयाची निवड, अभिनयासाठी घेतलेली मेहनत, भूमिकेचा अभ्यास यासगळ्यासाठी विद्या ओळखली जाते. या चित्रपटावर टीकाही झाली. मात्र एका वेगळ्या विषयावरील चित्रपट निर्मितीसाठी प्रेक्षकांनी तिला धन्यवाद दिले आहेत. (indian army honoured vidya balan by giving firing range her name in gulmarg)

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विद्याचा शेरनी (sherni movie) फॉर्मात आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही प्रचंड आहे. अभिनेत्री तापसी पन्नुनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन त्यात आपल्या यशाचे श्रेय विद्याला दिले आहे. दुसरीकडे भारतीय सैन्यानं विद्याच्या नावाचा गौरव केला आहे. काश्मिरस्थित भारतीय सेनेनं एका फायरिंग रेंजला विद्या बालनचे नाव दिले आहे. विद्या बालनचे मागील चारही सिनेमे प्रेक्षकांना कमालीचे आवडले होते. आपल्या वेगळ्यापणासाठी प्रसिद्ध असणा-या विद्याला भारतीय सैन्यानं एक आगळीवेगळी भेट दिली आहे.

विद्यानं आता आपल्या पुढील चित्रपटाची तयारीही सुरु केली आहे. ती सध्या आपल्या पतीसोबत फिरण्यासाठी काश्मिरमध्ये आली आहे. दुसरी अभिमानाची गोष्ट म्हणजे विद्याला ऑस्कर अकादमीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रणही आले होते. असे निमंत्रण मिळालेली ती यावर्षीची एकमेव अभिनेत्री आहे. त्या सोहळ्यामध्ये एकुण 395 मान्यवरांना बोलवण्यात आले होते. विद्याला पर्यटनाची फार आवड आहे. ती भारतीय सेनेच्या गुलमर्ग विंटर फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती.

हेही वाचा: "मुख्यमंत्र्यांनी राजू सापतेंच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा"

भारतीय सेनेनं तिच्या सन्मानासाठी काश्मिरमधील गुलमर्ग येथील एका फायरिंग रेंजचे नाव विद्या बालन असे ठेवले आहे. असा सन्मान मिळालेली विद्या बालन ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विंटर फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला होता. विद्या बालन फायरिंग रेंजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची परवानगी भारतीय सेनेनं विद्याला दिली आहे.

loading image