पुरग्रस्त केरळला सेलिब्रिटींनी दिला मदतीचा हात; 'या' सेलिब्रिटीने केली 5 कोटीची मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

अभिनेत्री सनी लिओनी ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण यावेळी ती चर्चेत आहे ते म्हणजे केरळ पुरग्रस्तांना तीने केलेल्या मदतीमुळे. तब्बल 5 कोटीची मदत करत सनीने मदतीचा हात पुढे केला आहे.

केरळमध्ये पुराने उध्वस्त् केलेले लोकांचे जीवन अनेकांच्या मदतीने सुरळीत व्हावे यासाठी देशभरातून प्रयत्न केले जात आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी पुराची तीव्रताच इतकी आहे की आतार्यंत जवळपास चारशे जणांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहे. अशात केरळ सरकारतर्फे तर पुरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी प्रयत्न केले जात आहेतच. पण अनेक सेलिब्रिटीजनेही मदतीचा हात पुढे सरसावला आहे. बॉलिवूड असो की टॉलिवूड असो कुणीही केरळची स्थिती सुधारायला हवी यासाठी मागे नाही. 

अभिनेत्री सनी लिओनी ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण यावेळी ती चर्चेत आहे ते म्हणजे केरळ पुरग्रस्तांना तीने केलेल्या मदतीमुळे. तब्बल 5 कोटीची मदत करत सनीने मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ही रक्कम सनीने दिल्याचं वृत्त आहे. या वृत्ताला सनीने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

Sunny Leone

तर दक्षिणेचे सुपरस्टार आणि राजकीय नेते कमल हसन आणि अभिनेता सुर्या यांनी प्रत्येकी 25 लाखांची मदत पुरग्रस्तांना केली आहे.

kamal hasan

अभिनेता शाहरुख खानने 'मीर फाउंडेशन' या एनजीओ द्वारे 21 लाख रुपयांची मदत केली आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसने 'हॅबिटेट फॉर ह्यूमॅनिटी इंडीया' या एनजीओद्वारे 5 लाखांची मदत केली आहे.  

Shahrukh Khan

'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास आणि अल्लू अर्जुनने केरळ रिलिफ फंडमध्ये प्रत्येकी 25 लाख रुपये दिले आहे. मिडिया रिपोर्टनुसार, दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांनी केरळ पुरग्रस्तांसाठी 15 लाख रुपयांची मदत केली आहे. तर तमिळ अभिनेता धनुष याने 15 लाख आणि तेलगू अभिनेता विजयने 5 लाख सहाय्यता निधी दिला आहे. 

south stars

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian celebrities help for kerala flood affected people