esakal | मराठमोळ्या आशिषकडे अनू मलिकने मागितला ऑटोग्राफ; म्हणाला...

बोलून बातमी शोधा

मराठमोळ्या आशिषकडे अनू मलिकने मागितला ऑटोग्राफ; म्हणाला...
मराठमोळ्या आशिषकडे अनू मलिकने मागितला ऑटोग्राफ; म्हणाला...
sakal_logo
By
शर्वरी जोशी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे 'इंडियन आयडॉल'. सध्या या शोचं १२ वं पर्व सुरु असून या पर्वात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या स्पर्धकांमधील आशिष कुलकर्णी आणि सायली कांबळे हे दोघं अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाले आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्या स्वरांची भूरळ अनेक दिग्गजांनादेखील पडली आहे. इतकंच नाही तर अलिकडे झालेल्या भागात आशिषचं गाणं ऐकून संगीतकार अनु मलिक मंत्रमुग्ध झाले असून त्यांनी चक्क आशिषचा ऑटोग्राफ घेतल्याचं पाहायला मिळालं.

'इंडियन आयडॉल'च्या मंच्यावर विशेष विकएण्ड भागात दरवेळी कलाविश्वातील काही प्रसिद्ध आणि नावाजलेल्या व्यक्ती हजेरी लावत असतात. अलिकडेच या भागात अनु मलिक आणि गीतकार मनोज मुंतशिर यांनी हजेरी लावली होती. यावेळी आशिषने 'ए भाई जरा देख के चलो' आणि 'तुमने मुझे देखा होकर मेहरबां' ही दोन गाणी सादर केली. विशेष म्हणजे ही गाणी अनु मलिकला प्रचंड भावली असून त्याने चक्क आशिषकडे ऑटोग्राफ मागितला.

"आशिष, मी खरंच तुझा खूप मोठा चाहता आहे. आज तू खरंच खूप सुंदररित्या गाणं सादर केलं. यापूर्वीही मी तुझी अनेक गाणी ऐकली आहेत. खरोखर तू छान गातोस. आज तू सादर केलेलं गाणं ऐकून मला तुझी स्वाक्षरी घेण्याची इच्छा होते," असं अनु मलिक म्हणाले.

दरम्यान, या मंच्यावर आशिष कुलकर्णी आणि पवनदीप यांची उत्तम जुगलबंदीदेखील पाहायला मिळाली. सोनी चॅनेलने त्यांच्या या विशेष भागाचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून सध्या तो चर्चिला जात आहे.