'किशोर कुमार यांना तरी सोडा', हिमेश, नेहानं गायलं गाणं

नेटक-यांनी त्यांना त्यावरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Himesh Reshmiya and Neha kakkar
Himesh Reshmiya and Neha kakkarTeam esakal

मुंबई - प्रसिध्द रियॅलिटी शो इंडियन आयडॉल (Indian Idol 12) हा नेहमीच चर्चेत राहणारा शो आहे. त्या शो मध्ये एकापेक्षा एक सरस कलाकार आपली कला सादर करत असतात. त्यात येणारे सेलिब्रेटींनाही त्या कार्यक्रमाचे खास कौतूक आहे. यावेळी इंडियन आयडॉलच्या बाराव्या सीझनमध्ये एक विशेष एपिसोडमध्ये प्रसिध्द गायक किशोर कुमार (Singer Kishor Kumar) यांच्या शंभर गाण्यांचा एक स्पेशल शो आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार (Amit Kumar) यांची उपस्थिती होती.

या विशेष शो मध्ये नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि हिमेश रेशमिया (Himesh Reshmiya) यांनी किशोर कुमार यांचे एक गाणे गायले. ते त्यांना आता महागात पडले आहे. नेटक-यांनी त्यांना त्यावरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. किशोर कुमार यांना श्रध्दांजली वाहिल्यानंतर त्यांची सदाबहार गाणी इतर स्पर्धक गात होते. त्यावेळी हिमेश आणि नेहानं आपली गायन कला सादर केली. मात्र ती काही प्रेक्षकांनी आवड़ली नाही. प्रेक्षकांनी या दोन्ही परीक्षकांवर टीका केली आहे.

Himesh Reshmiya and Neha kakkar
Video : 'येऊ कशी..'च्या सेटवर शुभांगी गोखलेंना अश्रू अनावर
Himesh Reshmiya and Neha kakkar
येऊ कशी तशी मी नांदायला: ऑनस्क्रीन मायलेकींची ऑफस्क्रीन मैत्री

सोशल मीडिया युझर्सचे (Social media users) असे म्हणणे होते की, नेहा आणि हिमेश यांनी किशोर कुमार यांचे गाणे गायले हे खरे. मात्र ते त्या गाण्याला न्याय देऊ शकले नाहीत. एका युझर्सनं लिहिलं आहे की, नेहा तुला गाण्याची कशी मोडतोड करायची आहे ती कर मात्र किशोर कुमारच्या गाण्यासोबत नको. तर दुस-या युझर्सनं त्या सर्व जजला चांगलेच फैलावर घेतले आहे. त्यानं लिहिलं आहे की, इंडियन आयडॉलमधील परीक्षकांनो किमान किशोर कुमारला तरी सोडा. तुम्ही अतिशय खराबपणे त्यांची गाणी गायली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com