'इंदू सरकार'मध्ये सीबीएफसी बोर्डाने सुचवले 17 कट

टीम ई सकाळ
मंगळवार, 11 जुलै 2017

मधुर भंडारकर दिग्दर्शित इंदू सरकार या चित्रपटाला सीबीएफसी बोर्डाने 17 कट सुचवले आहेत. या निर्णयाविरोधात मधुर भंडारकर रिवाइज कमिटीकडे जाणार असल्याचे समजते.

मुंबई : मधुर भंडारकर दिग्दर्शित इंदू सरकार या चित्रपटाला सीबीएफसी बोर्डाने 17 कट सुचवले आहेत. या निर्णयाविरोधात मधुर भंडारकर रिवाइज कमिटीकडे जाणार असल्याचे समजते.

या सिनेमातील काही संवादांनाही कात्री लावण्याची सूचना बोर्डाने निर्मात्याला केली आहे. यात प्राइम मिनिस्टर, इंटेलिजन्स ब्युरो, किशोर कुमार असे काही शब्द गाळण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. मधुर भंडारकर यांना याबाबत विचारले असता, सेन्साॅर बोर्डाने आपले काम केले. मला यातील काही सूचना अमान्य असल्याने मी रिवाइजल कमिटीपुढे जाणार आहे, असे सांगितले. 

इंदू सरकार हा 1975 च्या काळात घडणारा चित्रपट असून आणीबाणीचा काळ या सिनेमातून उभा राहतो. 

Web Title: indu sarkar CBFC esakal news