esakal | नाट्यगृहानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आग्रह
sakal

बोलून बातमी शोधा

Manoranjan

नाट्यगृहानंतर "सांस्कृतिक" कार्यक्रमांसाठी आग्रह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य सरकारने पाच नोव्हेंबरपासून (November) नाट्यगृहे (Theaters) पन्नास टक्के प्रेक्षकांच्या (audience) उपस्थितीत उघडण्याचा आदेश (Order) दिला आहे. सरकारच्या (Goverment) निर्णयाचे रंगकर्मीनी स्वागत केले असले तरी काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. नियमांचे (Rule) बंधन पाळत सांस्कृतिक कार्यक्रमांनाही (Cultural events) परवानगी देण्याची मागणी होत आहे.

राज्यभरातील रंगकर्मीनी ऑगस्टला तीव्र नऊ आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल घेत सरकारने एक सप्टेंबरपासून चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. काल चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील काही मंडळींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पाच नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरू करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले. सरकारच्या निर्णयाचे रंगकमींनी स्वागत केले. अभिनेते विजय पाटकर म्हणाले, की नाट्यगृहे सुरू होत आहेत याचा आनंद नक्कीच आहे; परंतु आम्ही केलेले आंदोलन केवळ नाट्यगृहे किंवा चित्रपटगृहे सुरू करावीत याकरिता नव्हते तर संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी होते. काही दिवसांमध्ये त्या बाबतीत निर्णयन घेतल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल.

हेही वाचा: पावसाळ्यात Ferry Ride चा आनंद घ्यायचाय? मग 'या' स्थळांना अवश्य भेट द्या

आम्हाला आनंद तर अजूनही दोनेक महिने घरी शांत बसावे लागणार आहे याची मनात खंत आहे. सरकारने दसऱ्याला नाट्यगृहे सुरू करणे आवश्यक होते आणि तेही शंभर टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत.

- हरी पाटणकर, नाट्य व्यवस्थापक

loading image
go to top