सौंदर्याची रुपराणी श्रीदेवीकडून प्रेरणा घेऊन राणी चटर्जी यांनी मायनस डिग्रीमध्ये ‘मस्त्राम’ साठी एक सीन शूट केले!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

राणी चटर्जी यांनी 5 डिग्री सेल्सियस तापमानामध्ये लेहेंगा / चनिया चोळी परिधान करून 'मस्त्राम' या वेबसिरिजसाठी शूट केले आहे.

असा विश्वास आहे की एखाद्या अभिनेत्याचे आयुष्य हे सर्व ग्लॅमर आणि सुखसुविधांनी संपूर्ण असते, परंतु ते सारे पडद्यामागील आयुष्य असते- असे बरेच वेळा होते की आपल्या आवडत्या कलाकारांना त्यांच्या मूलभूत अभिनयाच्या कौशल्यांपेक्षा जास्त बहरून काही तरी करावे लागते. अशीच एक चांदणी चित्रपटाची कहाणी ज्यावेळी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये सौंदर्य राणी श्रीदेवींनी रेशमी साडी परिधान केली होती आणि बर्फावर नृत्य केले होते.

नुकतीच एक सनसनाटी वार्ता ऐकू येत आहे की राणी चटर्जी या महान अभिनेत्री श्रीदेवींकडून प्रेरणा घेत 'मस्त्राम' या ५ डिग्री सेल्सियस मध्ये चित्रित केलेल्या वेब सिरिजमध्ये फक्त लेहंगा / चनिया चोळी परिधान केलेल्या दिसत आहेत. मस्त्राम हा एक ८० च्या दशकातील उत्कृष्ट लेखक, ज्याने हिंदी भाषेतून अनेक उत्कृष्ट दर्जाच्या कथा लिहिल्या आहेत. ज्या त्यानं भाषेच्या एका वेगळ्याच रुपात मांडल्या आहेत. त्या वाचल्यावर कित्येक तरी लोकांच्या मनात त्याने त्याच्या भाषेची गोडी पसरवली आहे. वास्तविक जीवनात दिवसेंदिवस अशांततेने घडणाऱ्या १० मसालेदार कथा त्याने लोकांपुढे लिखित स्वरूपात आणल्या आहेत. मुलगा ते पुरुष हा प्रवास त्यात घडणाऱ्या अनेक बदलांचे आवश्यक असे उत्तम मार्गदर्शन करणाऱ्या त्याच्या कथा आहेत.

मस्त्राम चा भाग १ हा वैशिष्ट्यीकृत आहे आणि त्याच शूटिंगदरम्यान घडलेला एक किस्सा सांगताना राणी म्हणाली, “आम्ही मनालीमध्ये चित्रीकरण करत होतो आणि मला चनिया चोळी घालणे आवश्यक आहे अशा पद्धतीनेचं माझे पात्र लिहिले गेले होते. यामुळे थर्मलचा समावेश करणे स्पष्टपणे अवघड होते. त्याचवेळी आमच्या दिग्दर्शकाने मला चांदणीची कहाणी सांगण्यास सुरुवात केली आणि श्रीदेवीजींनी त्या पात्राला काय दिले कसे निभावले विशेषत: ज्या ठिकाणी त्यांना साडीमध्ये बर्फावरुन शूट करावे लागले ते त्यांनी कशा पद्धतीने निभावले हे सांगितले.

मी नेहमीच श्रीदेवींची चाहती होती आणि त्यामुळे कशालाही न जुमानता मी त्या सीनला सर्वोत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला." या वेबसिरीज मध्ये अंशुमन झा, तारा अलीशा बेरी, आकाश दाभाडे, राणी चटर्जी, जगत रावत, केनिशा अवस्थी, गरिमा जैन, ईशा चब्रा आणि आभा पॉल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 30 एप्रिल 2020 पासून विनामूल्य एमएक्स प्लेयरवर वेबसिरीज उपलब्ध आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspired by Sridevi Rani Chatterjee shot a scene for Mastram in minus degrees