मराठी अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम अकाऊंंट हॅक; व्हिडिओ करून दिली माहिती

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

'या' अभिनेत्रीचं वेरीफाईड अकाउंट झालं हॅक, व्हिडिओच्या माध्यमातून दिली माहिती. पहा व्हिडीओ...

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री मानसी नाईक ही नेहमी चर्चेत असते. तिचा बोल्ड अंदाज आणि त्याचसोबत फॅशन स्टेटमेंट याला चाहत्यांची भरपूर पसंती आहे. मानसीचा डान्सदेखील तितकाच प्रसिद्ध आहे. तिच्या जबरदस्त डान्सचे हजारो चाहते आहेत. मानसी नाईक सोशल मीडियावरही अॅक्टीव असते. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून ती चाहत्यांशी गप्पाही मारते. मानसी नाईकला आता मात्र एका अडचणीचा सामना करावा लागत आहे. कारण, तिचं वेरीफाईड इन्स्टाग्राम अकाउंट मध्यरात्री अज्ञाताकडून हॅक करण्यात आलं आहे. 

घडलेल्या प्रसंगाची माहिती मानसीने एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली. या व्हिडीओमध्ये मानसी घडलेल्या प्रसंगाविषयी सांगत आहे. व्हिडीओमध्ये ती म्हणाली, 'आजची सकाळ माझ्यासाठी काहीशी वाईट ठरली कारण, माझं वेराफाईड इन्स्टाग्राम अकाउंट मध्यरात्री हॅक झालं आहे. दुर्देवाने अकाउंटची रिकव्हरी मला करता आली नाही. त्यामुळे हा व्हिडीओ मी केला आहे तो नातलग, मित्रमंडळी आणि खासकरुन माझ्या चाहत्यांसाठी.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 @aurelia_womenswear

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302) on

झालेल्या घटनेविषयी लोकांना सावध करताना ती पुढे म्हणाली,' माझ्या अकाउंटवरुन तुम्हाला कोणत्याही प्रकारची रिक्वेस्ट आल्यास ती स्विकारू नका. शिवाय माझ्या अकाउंटवरुन तुम्हाला वैयक्तीक माहिती मागणारा किंवा कॉन्टॅक्ट नंबर मागणारा DM (डायरेक्ट मेसेज) आल्यास त्याला रिप्लाय करु नका आणि कोणत्याही प्रकारची माहिती शेअर करु नका.' अकाउंट रिकव्हरी झाल्यावर मी त्याविषयीची अधिकृत माहिती सर्वांना देईन असंही मानसीने त्या व्हिडीओमधून नमूद केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Cok sevdim yalan oldu 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302) on

इन्स्टाग्राम अकाउंटवर मानसीने एका दिवसापूर्वी व्हिडीओ अपलोड केल्याचे समजते. हा व्हिडीओ तुर्की भाषेत असून त्याला दिलेलं कॅप्शनही त्याच भाषेत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instagram account of this marathi actress got hacked, watch video