'इन्स्टा' डाउन !; नेटीझन्स दुःखात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

फोटो आणि व्हिडीओ शेअरींगचे या युझर फ्रेंडली अॅपवर सध्या कोणत्याही प्रकारचे अपलोडींग वा सर्चींग होत नाही आहे.

मुंबई : नेटीझन्सचे लाडके इन्स्टाग्राम सध्या बंद पडले आहे ! 'इन्स्टा'प्रेमी सध्या या अॅपच्या दुरुस्तीची वाट बघत आहेत. सोशल मिडीयावर आपले वेगळे स्थान निर्माण करत 'इन्स्टा'ने फेसबुक आणि व्हॉट्स अॅप ला मागे टाकले आणि फार कमी कालावधीतच लोकप्रिय झाले. 

सामान्यांसोबतच सेलेब्रिटींमध्येही 'इन्स्टा'ची क्रेझ बघायला मिळते. फोटो आणि व्हिडीओ शेअरींगचे या युझर फ्रेंडली अॅपवर सध्या कोणत्याही प्रकारचे अपलोडींग वा सर्चींग होत नाही आहे. आयजीटीव्ही आणि 'इन्स्टा'स्टोरी या अपडेट फिचर्सनी 'इन्स्टा'प्रेमी सध्या खूश आहेत. 

'इन्स्टा' बंद पडल्याने ट्विटरवरही सध्या 'इन्स्टा डाउन' (#instagramdown) हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. 'इन्स्टा' हे अॅप एकुण 36 जागतिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. सात वर्ष जुन्या या अॅपच्या फॉलोअर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instagram Down and Netizens gets sad