'एका लग्नाची पुढची गोष्ट'ला परदेशातही मिळालं खूप प्रेम : प्रशांत दामले

Prashant Damle
Prashant Damle

पुणे : ज्या नाटकाने दोन दशके गाजवली, प्रेक्षकांच्या मनात आढळ स्थान निर्माण केले, अशा 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकाचा पुढचा भाग म्हणजेच 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या ही नाटकाने १५० प्रयोगांचा पल्ला गाठला आहे. प्रशांत दामले व कविता लाड यांची प्रमुख भूमिका असलेले हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे. 11 मे ला या नाटकाचा १५० वा प्रयोग होत आहे.

''नोव्हेंबरमध्ये सुरु झालेला 'एका लग्नाची पुढची गोष्ट'चा प्रवास अल्पावधीच यशस्वी झालाे. अगदी कमी काळात आम्ही राज्यभरात, देशभरात नव्हे तर परदेशातही नाटकाचे प्रयोग केले. सगळ्या प्रेक्षकांचे आम्हाला भरभरून प्रेम मिळाले आणि यामुळेच आम्ही नाटकाच्या १५० व्या प्रयोगाच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकलो,' अशा भावना अभिनेते प्रशांत दामले यांनी ई सकाळच्या फेसबुक लाईव्हमध्ये व्यक्त केल्या.

'कलाक्षेत्रात ज्यांना आपली कारकीर्द घडवायची आहे, अशा नवोदित कलाकारांसाठी भाषा, उच्चार, हावभाव, आवाज, नृत्य व अभिनय अशा सर्वच गोष्टी महत्वाच्या असतात. अशा हरहुन्नरी कलाकारांना मार्गदर्शन करण्याचे काम मी माझ्या टी-स्कुलमार्फत करतो. त्यांनी त्यांच्या पायावर भक्कम उभे राहावे हीच भावना त्यामागे असते,' असेही प्रशांत दामले यांनी सांगितले.

कलाकाराने आरोग्याची काळजी घेणे गरजेचे
कोणत्याही कलाकाराने आपल्या आरोग्याची योग्य वेळी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कामात झोकून द्यायचे असल्यास त्यासाठी आपली प्रकृती उत्तम असणे गरजेचे आहे. त्यातही नाटक कलाकारांना उपलब्ध सोयीसुविधांमध्ये आपली काळजी घेऊन काम करायला हवे, असेही दामले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com