Bigg Boss : शिव, अभिजीत, नेहा टॉप 3 मध्ये असतील!

दिपाली राणे-म्हात्रे | Tuesday, 23 July 2019

बिग बॉसच्या घरातल्या कोणत्या व्यक्तिसोबत वैशालीची गट्टी जमली आणि शिव-वीणाच्या नात्याबद्दल वैशालीचं काय मत आहे? जाणून घेण्यासाठी वाचा वैशालीची ही संपूर्ण मुलाखत...

बिगबॉस मराठीच्या घरातून नुकतीच बाहेर पडली ती गायिका वैशाली माडे.. घरातल्या कोणत्या व्यक्तिसोबत वैशालीची गट्टी जमली आणि शिव-वीणाच्या नात्याबद्दल वैशालीचं काय मत आहे? जाणून घेण्यासाठी वाचा वैशालीची ही संपूर्ण मुलाखत

प्रश्न- बिगबॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सगळ्यात पहिली कोणती गोष्ट केलीस?
वैशाली- सगळ्यात आधी मी माझ्या मुलीला म्हणजेच आस्थाला भेटले.. जवळपास 10 मिनिटे आम्ही एकमेकाला दारातंच मिठी मारून उभे होते.

प्रश्न- घरातली कोणती गोष्ट जास्त मिस करतेस?
वैशाली- खूप गोष्टी मिस करते..सकाळी उठून डान्स करणं, गळ्यातला माईक.

प्रश्न- बिगबॉस मराठीच्या घरातला कोणता कोपरा तुझा खास होता?
वैशाली- झोपाळा. मी कोणत्याही टेंशन मध्ये असले की मला शांत होण्यासाठी माझी आवडती जागा म्हणजे झुला.

प्रश्न- सगळ्यात जास्त डोकेबाज कोण आहे घरात?
वैशाली- फक्त अभिजीत केळकर.त्याच्या आसपास पण मला कोणी वाटत नाही. तो खूप फोकस आहे.

प्रश्न- शिव आणि वीणाच्या नात्याबद्दल काय सांगशील? तो तुझ्या खूप जवळचा आहे..
वैशाली- शिवबद्दल मला बोलायला खरंच आवडेल पण शिव आणि वीणाच्या केमिस्ट्रीबद्दल मी बोलू इच्छित नाही. त्यांच काय आहे काय नाही यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. पण शिव खरंच खूप भोळा आहे. गेम साठी उत्तम खेळाडू आहे.मनात काही पाप ठेवत नाही. प्रेमळ आहे.

प्रश्न- शिवानी पुन्हा एकदा घरात आल्यानंतर तुला तिच्यात काही बदल जाणवला का?
वैशाली- बदल वागण्यातुन दिसतात बोलण्यातुन नाही. मी आता तुला बदललेली दिसेल तू निरीक्षण कर असं तिने म्हणाल्यानंतरही मला तिच्यात बदल दिसला नाही.

प्रश्न- आता घरातून बाहेर पडल्यानंतर आगामी प्रोजेक्ट काय असणार आहेत?
वैशाली- हिनासोबत एक गाणं करायचं आहे. तसं आम्ही घरामध्ये असतानाच प्लान केला होता..आता ती सप्टेंबरमध्ये किंवा त्याआधी बाहेर आल्यावर आम्ही त्यानुसार ठरवू.

प्रश्न- टॉप 3 मध्ये कोणाला पाहतेस?
वैशाली- शिव ठाकरे, अभिजीत केळकर, नेहा.