IPL मध्ये एक चान्स मिळेल का? आमिरच्या प्रश्नावर रवी शास्त्रीचं भन्नाट उत्तर

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिरची ओळख आहे. त्याचा प्रत्येत क्षेत्रात वावर असतो.
IPL 2022 Aamir Khan Cricket playing video viral
IPL 2022 Aamir Khan Cricket playing video viral eskal

Aamir Khan: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिरची ओळख आहे. त्याचा प्रत्येत क्षेत्रात वावर असतो. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांवर तो अधिकारवाणीनं तो बोलतो. समाजात काही चुकीचे त्याला दिसल्यास त्यावर ठाम (IPL 2022) भूमिका घेणारा अभिनेता म्हणून आमिरचे नाव घ्यावे लागेल. सध्या तो त्याच्या लाल सिंग चढ्ढा नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (Bollywood News) हॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांसमोर येणार असून त्यामध्ये आमिर मुख्य भूमिकेत आहे. त्यात (Entertainment News) त्याच्या जोडीला करिना कपूर खान ही सहकारी अभिनेत्री (Ravi Shastri) आहे. काही दिवसांपूर्वी मैं की करा हे गाणं व्हायरल झालं होतं. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

लाल सिंग चढ्ढाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. आमिर त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन मोठ्या प्रभावीपणे करतो असे यापूर्वी दिसून आले आहे. त्यानं काही महिन्यांपूर्वी टॉलीवूडच्या आरआरआच्या प्रमोशनला हजेरी लावली होती. तोच काय बॉलीवूडचा भाईजान सलमानही एका खास कार्यक्रमाला हजर होता. पॅन इंडियाच्या प्रोजेक्ट अंतर्गत हे अभिनेते आता एकमेकांना सहकार्य करताना दिसत आहे.

aamir khan cricket video viral
aamir khan cricket video viral

गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडपेक्षा टॉलीवूडचा प्रभाव वाढताना दिसतो आहे. त्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. अशावेळी त्या चित्रपटांना टक्कर देण्यात बॉलीवुड कमी पडले आहे. आमिरनं त्याच्या लाल सिंग चढ्ढाच्या प्रमोशनच्या निमित्तानं एक व्हिडिओ व्हायरल केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये आमिरनं आपल्याला आयपीएल मध्ये एक संधी मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला आहे. आमिरचा हा व्हिडिओ स्पोर्टसच्या एका चॅनलवरुन व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तो नेट प्रॅक्टिस करताना दिसतो आहे.

मला आयपीएल मध्ये संधी मिळेल का असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळी उत्तरं त्याला दिली आहेत. अशातच प्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी आमिरला उत्तर दिलं आहे. रवी शास्त्री यांनी सांगितलं की, तो नेटमध्ये तर चांगला दिसतो आहे. मात्र त्याला त्याच्या फुटवर्कवर आणखी मेहनत घ्यावी लागेल. तसं झाल्यास त्याला कोणत्याही टीममध्ये जागा मिळेल.

रवी शास्त्रींच्या उत्तरावर आमीरनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यात तो म्हणतो रवी जी मी थोडा निराश आहे. माझं फुटवर्क तुम्हाला आवडलं नाही. मला वाटतं तुम्ही माझी लगाना पाहिलेली नाही. तुम्ही मला पुन्हा पाहा, मला वाटतं ती टीम लकी असेल ज्यात मी सहभागी होईल. तेव्हा माझी चांगल्या पद्धतीनं शिफारस करा. असं आमिर म्हणाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com