‘ KBC मध्ये 1 कोटी जिंकले, मॅगी पाकिटात 2 मसाला पाऊच मिळाले'

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 19 November 2020

केबीसीच्या त्या दिवशीच्या भागात 1 कोटी जिंकणाऱ्या मोहिता शर्मा यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. मोहिता शर्मा यांनी एक मजेदार ट्विट शेअर केले असून त्यावर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबई - केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपतीच्या करोडपतीच्या कार्यक्रमात कुणाचे नशीब कधी उजाळेल हे सांगता येत नाही. सध्या या कार्यक्रमाचा 12 वा सीझन सुरु आहे. आतापर्यत प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या शो मध्ये सातत्यानं नवनवीन गोष्टी घडत असतात. मागील काही दिवसांपूर्वी य़ा कार्यक्रमात सहभागी झालेल्या सनदी अधिकारी मोहिता शर्मा यांच्या सहभागाने हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

केबीसीच्या त्या दिवशीच्या भागात 1 कोटी जिंकणाऱ्या मोहिता शर्मा यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. मोहिता शर्मा यांनी एक मजेदार ट्विट शेअर केले असून त्यावर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

 

काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात नाझिया नसीम नावाच्या महिलेने 1 कोटी रुपये जिंकले होते. यानंतर आयपीएस मोहिता शर्मा यांनी देखील एक कोटी रुपये जिंकले आहेत.  ऊपरवाला जब देता है तो छप्पर फाडकर देता है. अशा प्रकारच्या कमेंट त्यांना युझर्सने दिल्या आहेत.

 

एकीकडे सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे त्यांनी केलेलं एक ट्विट चर्चेचा विषय ठरतोय. मोहिता यांना ‘मॅगी’च्या एका पॅकेटमध्ये मसाल्याचे दोन सॅशे मिळाले आहेत. असे आपल्या व्टिटमध्ये म्हटले आहे.

Image

‘केबीसीमध्ये एक कोटी रक्कम जिंकल्यानंतर मला मॅगीच्या एका पॅकेटमध्ये दोन मसाल्याचे सॅशे मिळाले आहेत. मी इतकी नशिबवान ठरेन असा कधी विचारच केला नव्हता. देवाची आज माझ्यावर कृपा आहे’, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला.

7 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.  त्यांनी   3,20,000 रुपये जिंकेपर्यंत त्यांनी एकही लाईफ लाईन वापरली नाही. काही दिवसांपूर्वी नाझिया नसीम नावाच्या महिलेने 1 कोटी रुपये जिंकले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ips women officer won one core in kbc seson12 post viral on soicial media