इरफानचा "मदारी' चीनमध्ये झळकणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

अभिनेता इरफान खानने एका गंभीर आजाराशी झुंज देत पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक करायचं ठरवलं. "हिंदी मीडियम 2' चित्रपटामधून तो नवी इनिंग सुरू करतोय...

मुंबई : अभिनेता इरफान खानने एका गंभीर आजाराशी झुंज देत पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक करायचं ठरवलं. "हिंदी मीडियम 2' चित्रपटामधून तो नवी इनिंग सुरू करतोय; पण त्यापूर्वी इरफानने सगळ्यांनाच खूश करणारी एक बातमी दिली आहे.

2016मध्ये प्रदर्शित झालेला त्याचा "मदारी' चित्रपट आता चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट समाजात घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घटनांवर भाष्य करणारा आहे. सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे निर्मल म्हणजेच इरफानला आपल्या मुलाला गमवावे लागते आणि त्यानंतर घडणाऱ्या घटना या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irfan Khan s Madari movie will release in China