
गेल्या वर्षी २९ एप्रिलला इरफान खानचं निधन झालं. आज ७ जानेवारी रोजी इरफानचा वाढदिवस आहे.
मुंबई- इरफान खान बॉलीवूडच्या त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे जो कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनात कायम राहिल. गेल्या वर्षी २९ एप्रिलला इरफान खानचं निधन झालं. आज ७ जानेवारी रोजी इरफानचा वाढदिवस आहे. या जबरस्त अभिनेत्याच्या वाढदिवशी त्याची आठण येणं स्वाभाविक आहे. या खास दिवशी जाणून घेऊया त्याच्या काही लोकप्रिय सिनेमा आणि त्यातील आठवणीतल्या भूमिकांविषयी
मीरा नायर यांचं दिग्दर्शन असलेल्या १९८८ मधील 'सलाम बॉम्बे' सिनेमात इरफान खानने एक पत्र लिहिणारं छोटंसं पात्र साकारलं होतं. या सिनेमात इरफानची छोटीशी भूमिका असली तरी त्याने एवढ्या कमी वेळेत त्याचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. हेच कारण आहे 'सलाम बॉम्बे'ला इरफानच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांमध्ये गणलं जातं. 'सलाम बॉम्बे' ऑस्करसाठी नामांकित झाला होता.
जिम्मी शेरगिल आणि हृषिता भट्ट स्टारर तिग्मांशू धूलियाचा सिनेमा 'हासिल'मध्ये इरफानने रणविजय सिंहची भूमिका साकारली होती. हा सिनेमा २००३ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमासाठी इरफानला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला होता.
'मकबुल' हा सिनेमा तर इरफान खानच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांमधील सगळ्यात प्रसिद्ध सिनेमा आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित या सिनेमात इरफानने मिया मकबुलची भूमिका साकारली होती जी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सिनेसमीक्षकांनी देखील या सिनेमाचं कौतुक केल होतं.
'पान सिंह तोमर'मधील इरफानची भूमिका कसं कोण विसरु शकेल. पान सिंह तोमरची त्याची भूमिका सगळ्यात उत्तम भूमिकांमधील एक आहे. या भूमिकेसाठी इरफानला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
'हैदर' या सिनेमात शाहिद कपूर जरी मुख्य भूमिकेत असला तरी इरफानच्या भूमिकेना यात जीव ओतला होता. या सिनेमातील रुहदारच्या भूमिकेतील त्याचा एक प्रसिद्ध डायलॉग- 'दरिया भी मै, दख्त भी मै, झेलम भी मै, चिनार भी मै, दैर भी हू, हरम भी हू, शिया भी हू, सुन्नी भी हू, मै हूं पंडित, मै था, मै हूं और में हीं रहूंगा.'
'हिंदी मिडियम' हा सिनेमा इरफानच्या भूमिकैतील एक वेगळा पैलू प्रेक्षकांसमोर आणतो. या सिनेमात त्याच्या अंदाजंच हटके होता. त्याची बोलण्याची स्टाईल त्याचा वास्तव अभिनय याच्या लोक प्रेमात पडले होते. या सिनेमाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सिनेमा आणि सर्वोत्कष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला होता.
'सात खून माफ' या सिनेमात प्रियांका चोप्राच्या पतीची भूमिका इरफानने साकारली होती. त्याच्या जबरदस्त अभिनय कौशल्याने या सिनेमात इतर कलाकारांपेक्षा तोच जास्त लक्षात राहिला. या सिनेमासाठी देखील त्याला खलनायकाचं नामांकन मिळालं होतं.
२०१५ मध्ये रिलीज झालेला 'पीकू' हा सिनेमा त्याच्या करिअरमधील वन ऑफ द बेस्ट सिनेमा ठरला. यामध्ये त्याने अमिताभ बच्चन, दीपिका पदूकोणसोबत राणा चौधरी नावाचं मजेशीर पात्र साकारलं होतं. ही भूमिका तर त्याचे चाहते कधीच विसरु शकणार नाहीत. आठ महिन्यांपूर्वी २९ एप्रिलला त्याचे जगाचा अचानक घेतलेला निरोप सगळ्यांसाठीच खूप मोठा धक्का होता.
irrfan khan birthday actor most memorable hindi films and characters