इरफानने गायले होते सुतापासाठी गाणे; मुलाने केला व्हिडीओ व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 24 October 2020

बाबिलने त्या दोघांचा गाणं गातानाचा शेयर केलेल्या व्हिडीओला मोठ्या संख्येने लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या आहेत. इरफान खान आणि त्यांची पत्नी सुतापा सिकंदर यांचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

मुंबई - प्रसिध्द अभिनेता इरफान खान याने अल्पावधीतच बॉलीवू़डमधून एक्झिट घेतली. यामुळे त्याच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला. त्याच्या जाण्याने बॉलीवूड एका गुणी अभिनेत्याला मुकली आहे. आपल्या अभिनयाने इरफानने एक वेगळे स्थान निर्माण केले. त्याचा ठसा कधीही न मिटणारा आहे. इरफानच्या मुलाने सध्या इरफानचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात इऱफानने त्याची पत्नी सुतापासाठी गाणे गायले आहे.

बाबिलने त्या दोघांचा गाणं गातानाचा शेयर केलेल्या व्हिडीओला मोठ्या संख्येने लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या आहेत. इरफान खान आणि त्यांची पत्नी सुतापा सिकंदर यांचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. ८९ हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये इरफान त्याच्या पत्नीसाठी सुतापासाठी खास गाणं म्हणत आहे. सुतापाला विमानतळावर सोडायला जात असताना इरफान तिच्यासाठी गाणं म्हणत होता. मात्र, मध्येच तो गाण्याचे बोल विसरतो आणि मग सुतापा त्याला गाण्यांच्या ओळी सांगते. हे त्या व्हिडिओमध्ये दिसते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mera saya ki tera saya? Dropping ma off at the airport now :(

A post shared by Babil (@babil.i.k) on

बाबेलने काही दिवसांपूर्वी इरफानच्या कबरीचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये या कबरीची झालेली वाईट अवस्था दिसून आली होती. वडिलांच्या कबरीची ही अवस्था पाहिल्यानंतर बाबिलने केलेल्या कामामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. इरफानने या कबरीचे काही फोटो शेअर करुन एक भावूक पोस्ट लिहिली आहे. इरफानची दुरावस्था झालेली कब्र बाबिलने पुन्हा नव्याने बांधली असून त्यावर फुलझाडांची लागवड केली आहे.

Irrfan Khan Son Babil Khan Shares His Father Throwback Pictures Of National  School Of Drama Days - इरफान खान के बेटे बाबिल ने वीडियो के बाद अब शेयर कीं  पिता की ये

२०१८ मध्ये इरफानला हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्युमर हा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्याने विदेशात जाऊन योग्य ते उपचारदेखील केले.मात्र, भारतात परतल्यानंतर २८ एप्रिल रोजी त्याची प्रकृती खालावली त्यामुळे त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान २९ एप्रिल रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irrfan Khan Sings Song For Sutapa Sikdar Mera Saaya Tera Saaya