esakal | बाबिल म्हणतो, 'यापुढं वडिलांच्या आठवणी शेअर करणार नाही’

बोलून बातमी शोधा

Irrfan  khan  son  babil  khan  reveals  why  he  stop  sharing irrfan memories
बाबिल म्हणतो, 'यापुढं वडिलांच्या आठवणी शेअर करणार नाही’
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील दिवंगत अभिनेता इरफान खानचा चाहता वर्ग मोठा आहे. 29 एप्रिल 2020 रोजी न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरमुळे त्याचे निधन झाले. दोन वर्ष इरफानने या आजाराला लढा दिला. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॅस्पिटलमध्ये त्यांने अखेरचा श्वास घेतला. इरफानचा मुलगा बाबिल सोशल मीडियावर नेहमी त्याच्या आठवणी शेअर करत असतो. पण गेले काही दिवस बाबिलने सोशल मीडियावर इरफानबद्दल काहीच पोस्ट केले नाही. याबाबत इऱफानच्या एका चाहत्याने बाबिलला विचारले ‘तु इरफानच्या आठवणी सोशल मीडियावर पुन्हा कधी शेअर करणार आहेस?’ त्यावर बाबिलने उत्तर दिले, ‘मला माझ्या वडिलांच्या आठवणी शेअर करायला खूप आवडते. पण नंतर मला खूप मेसेज येतात. या मेसेजमध्ये लिहीलेले असते की मी माझ्या वडिलांच्या अठवणींचा स्वत; ला प्रमोट करण्यासाठी वापर करत आहे.हे वाचून मला खूप वाईट वाटते. माझ्या वडिलांनी त्यांच्या चाहत्यांसाठी ज्या आठवणी ठेवल्या आहेत, त्या मला तुमच्या सोबत सएअर करायला खूप आवडते. आता मी खूप कन्फ्यूज आहे की मी नेमके काय करावे.’

त्यानंतर दुसऱ्या पोस्टमध्ये बाबिलने लिहीले,‘ मी विचार करत आहे मला असे मेसेज का येतात. हे मेसेज पाहून मला खूप वाईट वाटत आहे. अनेक जण माला म्हणतात की मी माझ्या वडिलांच्या अठवणींचा स्वत;च्या फायद्यासाठी आधार घेत आहे.मी त्यांचा मुलगा आहे मला असे करण्याची काहीच गरज नाही. मी या मेसेजमुळे आश्चर्यचकित आणि हर्ट झालो.’बाबिल लवकरच नेटफ्लिक्सवरील ‘क्वाला’ चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. हा चित्रपटाची निर्मीती अभिनेत्री अनुष्का शर्माने केली आहे. अन्विता दत्त या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत.

img

babil status

नुकतेच इरफानला दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. ‘अंग्रेजी मिडीयम’ या चित्रपटासाठी प्रमुख भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि फिल्मफेअरचा जिवन गौरव पुरस्कार इरफानला देण्यात आला. यावेळी बाबिलने इरफानचे कपडे परिधान केले होते. पुरस्कार सोहळ्यात वडिलांच्या आठवणीत बाबिल भावूक झाला होता.