इरफान खान लवकरच भारतात परतणार

गुरुवार, 4 एप्रिल 2019

लवकरच भारतात परत येणार असल्याचे इरफान खानने ट्विटवर सांगितले आहे. 

लंडन - बॉलिवूड अभिनेता इरफान खान याने काल ट्विटरवर आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी शेअर केली आहे. तो लवकरच भारतात परत येणार असल्याचे त्यांने ट्विटवर सांगितले आहे. 

एक वर्षांआधी म्हणजे 5 मार्च 2018 ला इरफान खान ने ट्विटरवर घोषणा करून न्यूरोइंडोक्राईन ट्यूमर या आजाराविषयी सांगितले होते. त्यानंतर ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये तो उपचार घेत होता.

ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये, "जिंकण्याची धडपड करता करता आपल्या लोकांच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आहे हे आपण अनेकदा विसरतो, त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येत नाही. आपल्या वाईट दिवसांमध्ये हे सगळे आठवते असे त्याने म्हटले आहे. तसेच अशा कठीण काळाचा सामना केल्यावर थोडे थांबून लोकांनी दिलेल्या अपार प्रेमाबदद्ल मी लोकांचे आभार मानू इच्छितो. कारण उपचारादरम्यान लोकांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे मला वेदना सहन करण्याची ताकद मिळाली असेही तो म्हणाला आहे.