"इश्‍कजादे' पुन्हा एकदा एकत्र 

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

2012 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट "इश्‍कजादे'मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेला अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री परिणीती चोप्रा. या दोघांनीही आता आपलं स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केलंय. खरं तर अर्जुन कपूरचा हा पहिला चित्रपट होता आणि परिणीतीचा मुख्य भूमिका असलेला हा पहिला सिनेमा होता. या चित्रपटाला पाच वर्षं उलटली असली, तरी हा चित्रपट व त्यातील गाणी आजही रसिकांना चांगलीच लक्षात आहेत. आता ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र येण्याची शक्‍यता आहे. दिबाकर बॅनर्जीच्या आगामी चित्रपटात हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

2012 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट "इश्‍कजादे'मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेला अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री परिणीती चोप्रा. या दोघांनीही आता आपलं स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केलंय. खरं तर अर्जुन कपूरचा हा पहिला चित्रपट होता आणि परिणीतीचा मुख्य भूमिका असलेला हा पहिला सिनेमा होता. या चित्रपटाला पाच वर्षं उलटली असली, तरी हा चित्रपट व त्यातील गाणी आजही रसिकांना चांगलीच लक्षात आहेत. आता ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र येण्याची शक्‍यता आहे. दिबाकर बॅनर्जीच्या आगामी चित्रपटात हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ऍक्‍शन थ्रिलरपट असून यात अर्जुन हरियाणवी पोलिसाच्या रोलमध्ये दिसेल. मात्र परिणीतीच्या भूमिकेबाबत अद्याप काहीच समजलेलं नाही. या सिनेमाचं शूटिंग याच वर्षी होणार आहे. खरं तर याबाबत दोघांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही; पण त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकदा एकत्र बघण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. 
 

Web Title: ishaqzaade once again