इश्‍कवाली जोडी 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही बॉलीवूडची लवी डवी इश्‍कवाली जोडी. ते नेहमी जरी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल काही बोलत नसले तरी ते एकत्र फिरायला जातात. पार्टीमध्ये एकत्र दिसतात वगैरे गोष्टी सगळ्यांना माहिती आहेतच. पण "कपूर ऍण्ड सन्स' या चित्रपटातील त्यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीनंतर आता दोघे परत एकत्र काम करताहेत. शकुन बत्राच्या या चित्रपटात दोघे दिसणार आहेत. हा चित्रपटही हलका-फुलका, लवस्टोरी असलेला चित्रपटच आहे. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री बघायला खूप धमाल येणारेय असं दिसतंय. कारण त्यांचे चाहतेही त्यांना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र बघण्यासाठी आतुर झालेत.

आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही बॉलीवूडची लवी डवी इश्‍कवाली जोडी. ते नेहमी जरी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल काही बोलत नसले तरी ते एकत्र फिरायला जातात. पार्टीमध्ये एकत्र दिसतात वगैरे गोष्टी सगळ्यांना माहिती आहेतच. पण "कपूर ऍण्ड सन्स' या चित्रपटातील त्यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीनंतर आता दोघे परत एकत्र काम करताहेत. शकुन बत्राच्या या चित्रपटात दोघे दिसणार आहेत. हा चित्रपटही हलका-फुलका, लवस्टोरी असलेला चित्रपटच आहे. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री बघायला खूप धमाल येणारेय असं दिसतंय. कारण त्यांचे चाहतेही त्यांना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र बघण्यासाठी आतुर झालेत. सिद्धार्थ सध्या तरी त्याचा आगामी चित्रपट "रिलोड'मध्ये बिझी आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल तो जास्त काहीच सांगत नाहीय; पण आलियाची स्तुती करताना थकतही नाहीय. त्यामुळे त्यांच्या या चित्रपटाची उत्सुकता शेवटपर्यंत राहणार, असं दिसतंय. 

Web Title: ishkvali jodi