माधुरीच्या गाण्यावर इस्त्राइलच्या स्वीमरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूडची (bollywood) क्रेझ जगभर पसरली आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.
माधुरीच्या गाण्यावर इस्त्राइलच्या स्वीमरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

मुंबई - बॉलीवूडची (bollywood) क्रेझ जगभर पसरली आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. वेगवेगळ्या देशांमध्ये बॉलीवूड चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग असल्याचे दिसुन आले आहे. सध्या ऑलिम्पिकचा फिव्हर आहे. त्यामुळे जिकडे पाहावं तिथे ऑलिम्पिकची चर्चा आहे. बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित (madhuri dixit) ही तिच्या हटकेपणासाठी ओळखली जाते. केवळ भारतातच नाही तर जगभर तिचा चाहतावर्ग आहे. हे दिसून आले आहे. माधुरीच्या गाण्याची क्रेझ किती मोठी आहे हे ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळाले आहे. सध्या तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

टोकियो (tokiyo olymipics) ऑलिम्पिक आता शेवटच्या टप्यात आला आहे. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांतील स्पर्धकांना त्यांच्या देशातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिला आहे. त्यापैकी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. इस्त्रायली स्विमिर इडन ब्लेचर आणि शेलीनं माधुरीच्या एका गाण्यावर डान्स केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. तिचा तो डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माधुरीचा आचा नचले नावाच्या गाण्यावर तो डान्स आहे.

माधुरीच्या गाण्यावर इस्त्राइलच्या स्वीमरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल
'अरे बाबा महिला नाही पुरुष हॉकी संघ जिंकलाय', फरहान अख्तर ट्रोल
माधुरीच्या गाण्यावर इस्त्राइलच्या स्वीमरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल
प्रसिद्ध लेखिका पद्मा सचदेव यांचे निधन, लता दिदींकडून शोक व्यक्त

स्पर्धेतील अॅक्वाटिक्स सेंटरमध्ये तिनं या आजा नचले गाण्यावर डान्स केला आहे. तो एक फ्री रुटीन प्रीलिमरी इव्हेंट होता. त्यात त्या दोघींनी कमाल केलीय. स्वीमिंग करताना त्यांनी केलेला डान्स हा आता सर्वांच्या कुतूहलाचा विषय झाला आहे. त्यांच्या त्या व्हि़डिओला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली आहे.

केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला मिळालेला प्रतिसाद मोठा आहे. भारतीय चाहत्यांनी त्या स्पर्धकांचे कौतूक केले आहे. अनेकांनी त्या स्पर्धकांचं कौतूक करताना त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. एका युझर्सनं लिहिलं आहे की, तुम्हा दोन्ही खेळांडूचं आभार. तुम्ही खूप सुंदर डान्स केला आहे. त्याचं आम्हाला कौतूक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com