esakal | थेट मोदी-शहांशी नडला! #IStandWithSiddharth हॅशटॅग होतोय ट्रेंड

बोलून बातमी शोधा

shidharh

#IStandWithSiddharth हॅशटॅग का होतोय ट्रेंड?

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- सोशल मीडियावर सध्या #IStandWithSiddharth हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड होताय. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थने सोशल मीडियावर एक ट्विट केलं. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला असून #IStandWithSiddharth हा हॅशटॅग ट्रेंड केला जात आहे. आपला मोबाईल नंबर लिक करण्यात आल्याचा आरोप सिद्धार्थने ट्विटच्या माध्यमातून केला होता. तसेच मला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. पण, मी थांत बसणार नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा, असं तो म्हणाला. विशेष म्हणजे त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केलं होतं.

सिद्धार्थने नेमकं काय ट्विट केलं होतं?

सिद्धार्थ आपल्या ट्विटमध्ये म्हणाला होता की, ''तमिळनाडूतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि आयटी सेलने माझा मोबाईल नंबर लिक केला. मला 24 तासांत जवळपास 500 कॉल आले असून त्यात मला आणि माझ्या परिवाराला जिवे मारण्याची, बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली. मी सर्व नंबरचा रिकॉर्ड ठेवला असून तो पोलिसांना देत आहे. मी शांत बसणार नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा.''

सिद्धार्थच्या या ट्विटनंतर अनेक नेटकरी त्याच्या समर्थनात पुढे आले आहेत. त्यांनी #IStandWithSiddharth हा हॅशटॅग वापरत सिद्धार्थ हा कना असलेला माणूस असल्याचं म्हटलं आहे. सिद्धार्थने अनेकदा भाजपवर टीका केली आहे. अनेकदा त्याने पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर थेट निशाणा साधला. सध्याच्या कोरोना स्थितीवरुनही त्याने सत्ताधारी भाजप सरकारला सुनावलं आहे.