esakal | 'ड्रीम गर्ल'ला कानाखाली मारण्यासाठी 'रावणा'चे २० रिटेक्स
sakal

बोलून बातमी शोधा

arvind trivedi and hema malini

'ड्रीम गर्ल'ला कानाखाली मारण्यासाठी 'रावणा'चे २० रिटेक्स

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अभिनेते अरविंद त्रिवेदी Arvind Trivedi यांचे वयाच्या ८२ वर्षी मुंबईत राहत्या घरी निधन झाले. रामायण Ramayan या मालिकेत साकारलेल्या रावणाच्या भूमिकेने त्यांना प्रसिद्धी मिळाली. या मालिकेशिवाय त्यांनी चित्रपटांमध्येही काम केलं होतं. त्यातील एक म्हणजे 'हम तेरे आशिक है'. या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री हेमा मालिनींसोबत Hema Malini स्क्रीन शेअर केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रेम सागर यांनी केले होते. त्याच चित्रपटातील एक किस्सा प्रेम सागर यांनी सांगितला.

या चित्रपटाच्या एका सीनमध्ये अरविंद यांना हेमा मालिनीच्या कानाखाली मारायचे होते. हा सीन शूट करताना अरविंद यांनी तब्बल २० वेळा रिटेक घेतला होता. याविषयी प्रेम म्हणाले, "मी त्याला (अरविंद) गुजराती रंगमंचावरून इंडस्ट्रीत आणलं होतं. तो एक विलक्षण अभिनेता होता. त्याकाळी त्याचा भाऊ उपेंद्र त्रिवेदी प्रचंड लोकप्रिय अभिनेता होता. हम तेरे आशिक है या चित्रपटात खलनायकी भूमिका साकारत असताना, एका सीनमध्ये अरविंदला हेमा मालिनीच्या कानाखाली मारायचं होतं. हा सीन करण्यासाठी त्याने २० वेळा रिटेक घेतले होते. हेमा मालिनी या त्याकाळी आघाडीच्या आणि सुपरहिट अभिनेत्री होत्या. त्यामुळे त्यांच्यावर हात उचलणं अरविंदसाठी कठीण होतं. नंतर आम्ही दोघांनी मिळून त्याला समजावलं की हे वास्तव नसून तुला फक्त अभिनय करायचा आहे."

हेही वाचा: अभिनेत्याने समजावल्यानंतर अरविंद त्रिवेदींनी स्वीकारली रावणाची भूमिका

१९७९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची पटकथा रामानंद सागर यांनी लिहिली होती. यामध्ये जितेंद्र आणि अमजद खान यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटात अरविंद त्रिवेदी यांनी नकारात्मक पात्र साकारलं होतं. त्यांनी अनेक गुजराती चित्रपटांमध्येही काम केलं होतं.

loading image
go to top