
Riteish - Genelia Deshmukh: २२ वर्ष झाली पण.. रितेशने दिलेला पहिला गुलाब जिनीलियाने जपून ठेवलाय
Riteish Deshmukh - Genelia Deshmukh Love Story: रितेश देशमुख आणि जिनीलिया देशमुख यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. रितेश आणि जिनिलिया या दोघांची जोडी महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे. लै भारी या मराठी सिनेमातून आला होळीचा सण या गाण्याच्या माध्यमातून जिनीलिया पहिल्यांदा मराठी सिनेमात दिसली. आता वेड सिनेमाच्या माध्यमातून जिनिलिया आणि रितेश या जोडीने पहिल्यांदाच मराठी सिनेमात एकत्र काम केलंय.
रितेश आणि जीनिलिया अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि रीलच्या माध्यमातून त्यांची एकमेकांबद्दलची धम्माल आणि रोमँटीक केमिस्ट्री सर्वांना दाखवत असतात. हे दोघे किती रोमँटिक आहेत याचा नुकताच एक खास किस्सा समोर आलाय. काही महिन्यांपूर्वी जीनिलियाने इंस्टाग्रामवर Ask Me Anything सेशन करून रितेश बद्दल एक खास खुलासा केलेला.
रितेश देशमुखकडून मिळालेलं बेस्ट गिफ्ट कोणतं असा प्रश्न एका फॅनने जिनिलियाला विचारला. त्यावेळी जिनिलियाने उत्तर देताना गुलाबाचा एक फोटो पोस्ट केला. ते गुलाब काळं पडून कोमेजून गेलेलं. सुकलेलं गुलाब बघून अनेकांना प्रश्न पडला. नंतर जीनिलियाने खुलासा केला, हे गुलाब रितेशने तिला दिलेलं पहिलं गिफ्ट होतं.
२० वर्षांपूर्वी जेव्हा रितेश आणि जिनिलिया एकमेकांना डेट करत होते तेव्हा रितेशने तिला हे गुलाब दिलं होतं. २० वर्ष उलटून गेली तरीही जिनिलियाने हे खास गिफ्ट जपून ठेवलंय. हे गुलाब जरी सुकलं तरीही रितेश - जिनीलीयाचा प्रेमाचा दरवळ अजून कायम आहे असंच म्हणावं लागेल.
रितेश - जीनिलिया देशमुख यांच्या वेड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७० पेक्षा जास्त कोटींची कमाई केली. न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला मराठी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. वेड सिनेमात रितेश - जिनिलिया सोबत जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुपरस्टार सलमान खानचं वेड लावलंय हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडिंग वर आहे.