शाहरूखची राधा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जून 2017

बॉलीवूडचा किंग खान शाहरूख आणि सुलतान गर्ल अनुष्का शर्मा यांचा आगामी चित्रपट "जब हॅरी मेट सेजल' सिनेमातील पहिलं गाणं "राधा' प्रदर्शित झालं.

सुखविंदर सिंग आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरांत सजलेल्या "राधा' या गाण्यावर शाहरूख आणि अनुष्का थिरकताना दिसताहेत. या गाण्याची सुरुवात होते शाहरूखपासून. सेजल ऊर्फ अनुष्का शर्माला पंजाबी लोक मोठ्या आवाजात का बोलतात, हे तो समजावून सांगत असतो.

शाहरूख म्हणाला की, पंजाबी लोक बहुतकरून शेतकरी असतात. शेतात काम करत असताना ट्रॅक्‍टरच्या आवाजामुळे त्यांना मोठ्या आवाजात गाणं गायला लागतं. असं सांगून हॅरी गाणं गायला सुरुवात करतो आणि सेजल ऊर्फ अनुष्काही उत्साहित होऊन त्याच्यासोबत ताल धरू लागते आणि दोघेही गाण्यावर थिरकू लागतात. "जब हॅरी मेट सेजल' चित्रपटात पंजाबी मुंडा आणि गुजराती छोकरीची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. ही प्रेमकथा आणि तीही इम्तियाज स्टाईल पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. 

Web Title: jab harry met sejal