जॅकी दादांनी जोडले हात, 'परफॉर्मन्स' पाहिल्यावर अश्रु आवरेना!

Jackie Shroff
Jackie Shroff

Tv Entertainment: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या इंडियाज गॉट टँलेट या कार्यक्रमातील एका सादरीकरणाची (Entertainment News) चर्चा आहे. सध्या या रियॅलिची शो चा 9 वा सीझन सुरु आहे. त्यामध्ये जॅकी दादा सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. (Jackie Shroff) त्यांनी जेव्हा त्या शो मध्ये सादरीकरण (India’s Got Talent) केलेल्या इशिताचे गाणे ऐकले तेव्हा ते कमालीचे भारावून गेले. त्यांना अश्रु आवरेना. अशावेळी त्यांनी ईशिताचं तोंड भरून कौतूक केलं. सध्या या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यावर त्यांनी कमेंटही केल्या आहेत.

इंडियाज गॉट टँलेटमधील एक गायिका इशितानं आपल्या गायकीनं सर्वांना खूश केलं आहे. आणि चकितदेखील. तिचं गाणं ऐकून जॅकी दादा भावूक झाल्याचे दिसून आले आहे. इशितानं आपल्या आवाजनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांना प्रतिक्रिया आणि दाद देण्यास भाग पाडले आहे. तिचा आवाज जेव्हा जॅकी श्रॉफ यांनी ऐकला तेव्हा त्यांना अश्रु आवरणं कठीण झालं होतं. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी इशिताचं कौतूक केलं आहे. जॅकी दादांनी इशिताला हात जोडले आणि तिला आशीर्वाद दिले.

Jackie Shroff
Video Viral: जेनेलियानं 'श्रीवल्ली' सुरु केलं, तेवढ्यात...

जॅकी श्रॉफ यांच्या आगामी वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, ते शेवटी अक्षयकुमारच्या सूर्यवंशीमध्ये दिसून आले होते. त्यामध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला मोठं यश मिळालं होतं. त्यामध्ये जॅकी दादांच्या भूमिकेचे कौतूक झाले होते. आता ते सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्या फोन भूतमध्ये दिसणार आहे. अजून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. इंडियाज गॉट टँलेट या शोचे होस्टिंग अर्जुन बिजलानी करत असून त्यामध्ये करण जोहर, शिल्पा शेट्टी, बादशहा, मनोज मुंतशिक हे जज आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com