बिग बॉस फेम आसिम रियाझ आणि जॅकलीनचं होळी स्पेशल गाणं रिलीज.. 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 March 2020

'बिग बॉसच्या 13' व्या सिजनचा उपविजेता आणि मॉडेल आसिम रियाजचं पहिलं गाणं 'मेरे अंगने मे' होळीच्या एक दिवस आधी रिलीज करण्यात आलंय..

'बिग बॉसच्या 13' व्या सिजनचा उपविजेता आणि मॉडेल आसिम रियाजचं पहिलं गाणं 'मेरे अंगने मे' होळीच्या एक दिवस आधी रिलीज करण्यात आलंय..या गाण्यात आसिम अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबत दिसून येतोय..गाण्याची स्टोरीलाईन मजेशीर असून आसिम आणि जॅकलीनची जोडी देखील कमाल दिसतेय..

हे ही वाचा : या टॅगमुळे वैतागली करिना, म्हणाली...

या गाण्याची वेळेचा प्रवास अशी कल्पना दाखवण्यात आलीये..जॅकलीन 1435च्या काळातली एक राजकुमारी आहे जिचं लग्न त्याच काळातले एक महाराज शांतनू तूतूजी देव यांच्यासोबत ठरलंय..मात्र राजकुमारी या लग्नामुळे खुष नाहीये..दुसरीकडे 2020मध्ये होळीच्या दरम्यान एक मुलगी त्याच्या बॉयफ्रेंडला 1435 च्या काळात पाठवते आणि तो त्या काळात जाऊन आसिम रियाज बनतो..आणि शेवटी तो जॅकलीनला त्याच्यासोबत घेऊन येतो..

'मेरे अंगने मे' हे रिमिक्स वर्जन गाणं नेहा कक्कर आणि राजा हसन यांनी गायलंय...या गाण्याचं संगीत तनिष्क बागचीने रिक्रिएट केलंय..राधिका राव आणि विनय सपरु यांनी दिग्दर्शन केलं असून हे गाणं वायू यांनी लिहीलं आहे..गाण्यात जॅकलीन आणि आसीमसोबतंच अनुज सैनी आणि खुशी जोशी देखील दिसून येतायेत..  

Image result for JACQUELINE ASIM SONG OUT

हे गाणं अमिताभ बच्चन यांच्या 'लावारिस' या सिनेमातील 'मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है' या गाण्याचं रिमिक्स वर्जन आहे..आमिताभ यांच्या सिनेमातील गाण्याला त्यांनी स्वतः आवाज दिला होता..त्या गाण्यात ते त्यांच्या हटके स्टाईलने नाचताना दिसून आले होते...

jacqueline fernandez and asim riaz mere angne mein song release


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jacqueline fernandez and asim riaz mere angne mein song release